TRENDING:

मराठवाड्यात थंडीचा जोर, 3 जिल्ह्यांत पारा घसरला, हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात थंडीचा जोर, 3 जिल्ह्यांत पारा घसरला,हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट
राज्यातील अनेक भागात सध्या थंडीची लाट निर्माण झाली असून पारा चांगलाच घसरला आहे. मराठवाड्यातमध्ये थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 जानेवारीला निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात इतर शहरांच्या तुलनेत जास्त घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना गुलाबी थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
3/5
लातूरमध्ये कमाल तापमान 30 तर किमान तापमान 13 अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत किमान तापमान 13 अंश सेल्सियस असेल.
advertisement
4/5
बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 16 अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
दरम्यान, वातावरणातील बदलांचा मानवी आरोग्यावर आणि शेती पिकांवर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तर शेतकऱ्यांना देखील आपल्या पिकांना सांभाळावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात थंडीचा जोर, 3 जिल्ह्यांत पारा घसरला, हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल