Alia Bhatt: "काही सेकंदाच्या व्हिडीओवरुन...", आलिया भटने ट्रोलर्सवर सोडले टीकेचे बाण
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. आलियाने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपर डुपर हिट सिनेमे बॉलिवूडला देत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सध्या आलिया एका मुलाखतीमुळे चर्चेत आली असून तिने मुलाखतीत ट्रोलर्सला चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
advertisement
1/9

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. आलियाने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपर डुपर हिट सिनेमे बॉलिवूडला देत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सध्या आलिया एका मुलाखतीमुळे चर्चेत आली असून तिने मुलाखतीत ट्रोलर्सला चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
advertisement
2/9
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टार कपलपैकी आहे. कायमच चर्चेत राहणाऱ्या या कपलवर जेवढा कौतुकाचा वर्षाव होतो. तितकाच ट्रोलिंगचा सुद्धा... 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं.
advertisement
3/9
कायचम सोशल मीडियावर जेवढा कौतुकाचा वर्षाव केला जातो, तेवढंच तिला ट्रोल सुद्धा केलं जातं. अशातच अभिनेत्रीने एसक्वायर इंडियाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आमच्यापर्यंत ट्रोलर्सचा आवाज पोहोचतच नाही, असं भाष्य केलंय. अभिनेत्रीचा हा मुद्दा सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला.
advertisement
4/9
आलिया ट्रोलर्सबद्दल म्हणालीये की, "आमच्यापर्यंत ट्रोलर्सचा आवाज पोहोचतच नाही, कारण, ते सर्व खोटं असतं. लोकं जेमतेम 2 ते 4 सेकंदाचा व्हिडिओ पाहून मत देतात. मी आणि रणवीर गेल्या सात वर्षांपासून एकत्र आहोत आणि लोकं त्यापेक्षा जास्त टीका करत आहेत.
advertisement
5/9
आलिया म्हणाली की, मी आणि रणबीर कधी- कधी आमच्यावर बनलेल्या मीम्सवर हसत असतो. त्यामुळे आमच्यावर त्याचा काहीही फरक पडत नाही. परेशानीचा 'प' सुद्धा आमच्या आयुष्यात येत नाही. समजा तुम्ही 50 लोकं असलेल्या खोलीत आहेत. तर त्यातील फक्त चार लोकंच तुमच्याबद्दल चांगलं बोलतील.
advertisement
6/9
पुढे आलिया म्हणाली की, बाकीचे लोकं तुमच्याबद्दल वाईटच विचार करतील, म्हणून तुम्ही त्यांचं ऐकत नाही. त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या कुटुंबावर थोडीच फरक पडणार आहे? अजिबातच नाही. मी माझं स्वप्न जगत आहे का? तर हो... रोज रात्री झोपण्याआधी मी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते? तर हो १०० टक्के.
advertisement
7/9
"मला कायमच रणबीरसोबत सुरक्षित भावना येतात. मला कोणालाही कोणतीही गोष्ट समजावून सांगण्याची गरज वाटत नाही. जेव्हा आपण या जगात येतो तेव्हा आपली सर्वात मजबूत प्रवृत्ती म्हणजे जगणे आणि कुटुंबाभोवती ती प्रवृत्ती नाहीशी होते.", असं आलिया मुलाखतीच्या शेवटच्या भागात म्हणाली.
advertisement
8/9
शेवटी आलिया म्हणते, "तुम्हाला असे वाटते की सर्व काही ठीक आहे. वेळ सहज निघून जाते, तुम्हाला सुरक्षित वाटते. जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षित राहणे. आणि माझ्यासाठी, त्याच्यापेक्षा सुरक्षित जागा नाही."
advertisement
9/9
आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या "लव्ह अँड वॉर" या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दोघेही एकत्र दिसणार आहेत, ज्यामध्ये विकी कौशल देखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Alia Bhatt: "काही सेकंदाच्या व्हिडीओवरुन...", आलिया भटने ट्रोलर्सवर सोडले टीकेचे बाण