TRENDING:

हीच खरी लक्ष्मी! ज्ञानदामुळे हर्षदला मिळालं हक्काचं घर, एका हट्टाने फळफळलं नशीब; सांगितला 'तो' रंजक किस्सा

Last Updated:
लग्नाआधी स्वतःचं हक्काचं घर असावं, ही प्रत्येक तरुणाची इच्छा असते आणि हर्षदच्या बाबतीत हे स्वप्न पूर्ण करण्यामागे खुद्द ज्ञानदाचा मोठा हात आहे.
advertisement
1/10
हीच खरी लक्ष्मी! ज्ञानदामुळे हर्षदला मिळालं हक्काचं घर; एका हट्टाने फळफळलं नशीब
dnyan मराठी मनोरंजन विश्वातील गोड चेहरा आणि 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. महिनाभरापूर्वीच तिचा साखरपुडा सिनेमॅटोग्राफर हर्षद आत्माराम याच्याशी थाटामाटात पार पडला.
advertisement
2/10
पण ही लव्हस्टोरी केवळ रोमान्सपुरती मर्यादित नाही, तर त्यामागे एक खूपच प्रॅक्टिकल आणि प्रेरणादायी गोष्ट दडलेली आहे. लग्नाआधी स्वतःचं हक्काचं घर असावं, ही प्रत्येक तरुणाची इच्छा असते आणि हर्षदच्या बाबतीत हे स्वप्न पूर्ण करण्यामागे खुद्द ज्ञानदाचा मोठा हात आहे.
advertisement
3/10
लग्नाची बोलणी सुरू झाली की 'मुलाचं स्वतःचं घर आहे का?' हा प्रश्न ठरलेला असतो. हर्षद मूळचा पुण्याचा. पुण्याच्या निगडी भागात त्याचं घर होतं, पण ते त्याच्या वडिलांनी कमावलेलं होतं.
advertisement
4/10
मुंबई-ठाण्यासारख्या शहरात स्वतःचं घर असावं असं हर्षदला वाटायचं, पण ते कसं शक्य होईल याची त्याला शाश्वती नव्हती. अशा वेळी ज्ञानदा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
advertisement
5/10
हर्षदने नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला की, ज्ञानदाला आधीच म्हाडाचं घर लागलं होतं. तिने हर्षदलाही म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी गळ घातली. सुरुवातीला हर्षद साशंक होता.
advertisement
6/10
एवढी मोठी रक्कम कशी उभी करायची? कर्ज कसं फेडायचं? असे अनेक प्रश्न त्याला सतावत होते. पण ज्ञानदाने त्याला फक्त एकच सांगितलं, "तू फक्त 'गो विथ द फ्लो' राहा, सगळं नीट होईल."
advertisement
7/10
ज्ञानदाचं ऐकून हर्षदने म्हाडाचा फॉर्म भरला आणि नशिबाने त्याला चक्क ठाण्यामध्ये स्वतःचं हक्काचं घर लागलं. एकामागून एक गोष्टी जुळत गेल्या. घरच्यांनी आर्थिक पाठबळ दिलं, आईने मदत केली आणि बघता बघता हर्षद एका घराचा मालक झाला.
advertisement
8/10
आज परिस्थिती अशी आहे की, ज्ञानदाचंही ठाण्यात स्वतःचं घर आहे आणि हर्षदचंदेखील! या यशाचं संपूर्ण श्रेय हर्षदने ज्ञानदाला दिलं आहे. तिने जर प्रोत्साहन दिलं नसतं, तर कदाचित आज तो घराचा मालक झाला नसता, असं त्याने कृतज्ञतेने सांगितलं.
advertisement
9/10
ज्ञानदा आणि हर्षदची ओळख २०१५ मध्ये झाली. २०१९ मध्ये हर्षदने तिला लग्नासाठी विचारलं आणि आता जवळपास ६-७ वर्षांच्या रिलेशनशिप नंतर हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.
advertisement
10/10
ज्ञानदा अवघ्या २२ व्या वर्षी हर्षदच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या वयात ७ वर्षांचं अंतर असलं तरी त्यांच्या विचारांची प्रगल्भता थक्क करणारी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हीच खरी लक्ष्मी! ज्ञानदामुळे हर्षदला मिळालं हक्काचं घर, एका हट्टाने फळफळलं नशीब; सांगितला 'तो' रंजक किस्सा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल