'ट्रोलर्स ज्या पद्धतीने...', युझवेंद्र चहलसोबत नाव जोडलं, शेफाली बग्गा संतापली; AI फोटो बनवणाऱ्याला अभिनेत्रीने झापलं!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Yuzvendra Chahal-Shefali Bagga: कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटानंतर चहलचं नाव वारंवार कोणा ना कोणाशी जोडलं जातंय. पण आता हा वाद एका वेगळ्याच वळणावर आला आहे.
advertisement
1/8

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा मैदानावर फलंदाजांना आपल्या गुगलीने घाम फोडण्यासाठी ओळखला जातो. पण सध्या त्याच्या खासगी आयुष्यातील गुगलीने सोशल मीडियावर एकच राडा घातला आहे.
advertisement
2/8
कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटानंतर चहलचं नाव वारंवार कोणा ना कोणाशी जोडलं जातंय. पण आता हा वाद एका वेगळ्याच वळणावर आला आहे. 'बिग बॉस १३' ची स्पर्धक आणि प्रसिद्ध होस्ट शेफाली बग्गा हिचं नाव चहलसोबत जोडल्यानंतर तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
advertisement
3/8
सध्या सोशल मीडियावर एक एआय जनरेटेड पोस्टर तुफान व्हायरल होत आहे. हे पोस्टर कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करू' या चित्रपटाच्या पोस्टरप्रमाणे बनवण्यात आलं आहे.
advertisement
4/8
यामध्ये युझवेंद्र चहल मध्यभागी असून त्याच्या आजूबाजूला त्याची एक्स पत्नी धनश्री वर्मा, आरजे महवश आणि शेफाली बग्गा यांचे फोटो लावण्यात आले आहेत. ग्राफिक डिझायनर विजय कुमार बारिया याने हे पोस्टर बनवलं होतं, पण शेफालीला मात्र यातलं ह्युमर मुळीच आवडलेलं नाही.
advertisement
5/8
आपलं नाव अशा पद्धतीने चहलसोबत एका पोस्टरमध्ये पाहिल्यानंतर शेफालीने इन्स्टाग्राम स्टोरीवरून नेटिझन्सना चांगलंच धारेवर धरलं. ती म्हणाली, "हे अत्यंत घृणास्पद आहे! ट्रोलर्स ज्या पद्धतीने मुलींना लक्ष्य करतात, ते पाहून लाज वाटते. स्वतःचं आयुष्य जगण्याऐवजी दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणं ही विकृत मानसिकतेचं लक्षण आहे."
advertisement
6/8
शेफाली आणि युझवेंद्र यांच्या अफेअरच्या चर्चा अचानक सुरू झाल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी या दोघांना मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर गॉसिप पेजेसवर या नवीन जोडीबद्दल चर्चा सुरू झाली. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्यावर अधिकृतपणे कोणतंही शिक्कामोर्तब केलेलं नाही.
advertisement
7/8
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा संसार मोडून आता बराच काळ लोटला आहे. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच हे दोघं वेगळे राहत होते आणि मार्च २०२५ मध्ये वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं.
advertisement
8/8
धनश्रीने चहलवर फसवणुकीचे आरोप केले होते, तर चहलचं नाव त्यानंतर आरजे महवशसोबतही जोडलं गेलं. आता शेफालीसोबतचं नाव चर्चेत आल्याने चहल पुन्हा एकदा हेडलाईन्समध्ये आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ट्रोलर्स ज्या पद्धतीने...', युझवेंद्र चहलसोबत नाव जोडलं, शेफाली बग्गा संतापली; AI फोटो बनवणाऱ्याला अभिनेत्रीने झापलं!