TRENDING:

Marathwada Weather Update: छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पावसाची शक्यता, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
1/6
छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पावसाची शक्यता, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात थंडीचा जोर कायम आहे. अशातच आता राज्यातील तुरळक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. 6 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
2/6
छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 जानेवारीला सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 2 दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस असेल. जालन्यातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
3/6
बीड जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहणार आहे. हवामान स्वच्छ असल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दैनंदिन कामे सुरळीत पार पाडता येतील.
advertisement
4/6
लातूर जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. कोरडे हवामान असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश सेल्सिअस असेल. या भागात पावसाचा अंदाज नसल्याने शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामात व्यस्त राहतील.
advertisement
5/6
नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस असेल. कोरडे आणि उष्ण हवामान असल्याने नागरिकांनी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी अधिक प्यावे. परभणी जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील. शेतकऱ्यांना हवामान अनुकूल ठरेल.
advertisement
6/6
हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील. जिल्ह्यातील हवामान स्वच्छ आणि कोरडे राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पावसाची शक्यता, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल