आजचं हवामान: वादळी पाऊस झोडपणार, 24 तासांत हवा बदलणार, संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज 3 जिल्ह्यांत पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. तर पुढील 24 तासांत हवापालट होणार आहे.
advertisement
1/5

गेल्या काही काळात मराठवाड्यावर आस्मानी संकट घोंघावत आहे. आज पुन्हा वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपिटीचा धोका काही ठिकाणी असणार आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज तर 5 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालना या जिल्ह्यांना बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार या जिल्ह्यांतील काही भागाला वादळी पावसासह गारपिटीने झोडपले. तर इतर 5 जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला होता. या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.
advertisement
3/5
आज छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या 4 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात 30 त 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांत मात्र आज हवामानात मोठे बदल जाणवतील. आज या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. तरीही या ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता आहे. हवामान अंशत: ढगाळ राहील.
advertisement
5/5
दरम्यान, शुक्रवार, 9 मे रोजीपासून मराठवाड्यात हवापालट होणार आहे. बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. तसेच उन्हाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आजचं हवामान: वादळी पाऊस झोडपणार, 24 तासांत हवा बदलणार, संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांना अलर्ट