TRENDING:

Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा संकट, छ. संभाजीनगर, बीडसह या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून वादळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी आठही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यावर पुन्हा संकट, छ. संभाजीनगर, बीडसह या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट
मराठवाड्यात आज हवामानाचे चित्र पूर्णपणे बदलले असून हवामान विभागाने संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या आठही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागात विजांचा कडकडाट, वाऱ्याची तीव्रता आणि पावसाच्या सरींचा अनुभव होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील काही भागांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. विशेषतः दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढू शकतो.
advertisement
3/5
राज्याच्या दक्षिण भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम मराठवाड्याच्या हवामानावर स्पष्टपणे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून कोरडे वातावरण असले तरी आजपासून हवामानात झालेला हा बदल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. पावसामुळे मातीतील ओलावा टिकून राहू शकतो.
advertisement
4/5
आज पावसासह येणारे जोरदार वारे आणि विजेचा कडकडाट काही ठिकाणी अडचणी निर्माण करू शकतात. विशेषतः कापूस, सोयाबीन आणि हरभरा पिकांवर या बदलाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
5/5
दरम्यान, हवामान विभागाने मराठवाड्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. वीजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली अथवा मोकळ्या जागी थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील 24 तासांत हवामानात आणखी बदल होण्याची आणि काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा संकट, छ. संभाजीनगर, बीडसह या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल