TRENDING:

Chhatrapati Sambhajinagar Rain : छत्रपती संभाजीनगरमध्ये हाहाकार! कोणाचं घर, कोणाच्या गाड्या पाण्याखाली; मन हेलावून टाकणारे Photos

Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Rain : ‎मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये झालेला पावसाचा फटका सर्वच जिल्ह्यांना बसला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला देखील याचा फटका बसला आहे. शहरातील मुकुंदवाडी परिसरात असलेल्या मुकुंदनगर भागातील नागरी वसाहतीत पाणी साचल्याने परिसराला तलावाचं स्वरूप आला आहे. ‎काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जन जीवन विस्कळीत झालंय. घरातील संसार उपयोगी वस्तू पाण्यात भिजल्या आहेत. घरात शिरलेले पाणी काढण्यासाठी नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे.
advertisement
1/7
कोणाचं घर, कोणाच्या गाड्या पाण्याखाली; संभाजीनगरमधील मन हेलावून टाकणारे Photos
‎मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये झालेला पावसाचा फटका सर्वच जिल्ह्यांना बसला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला देखील याचा फटका बसला आहे. शहरातील मुकुंदवाडी परिसरात असलेल्या मुकुंदनगर भागातील नागरी वसाहतीत पाणी साचल्याने परिसराला तलावाचं स्वरूप आला आहे.
advertisement
2/7
‎काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जन जीवन विस्कळीत झालंय. घरातील संसार उपयोगी वस्तू पाण्यात भिजल्या आहेत. घरात शिरलेले पाणी काढण्यासाठी नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे.
advertisement
3/7
मुसळधार पावसामुळे वाळूज बजाज नगरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. सारा व्यंकटेश व सारा आकृती सोसायटींसह परिसरातील इतर सोसायट्यांमध्येही पाणी घरात घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
4/7
‎अनेक रहिवाशांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांमध्ये पाणी शिरून हानी झाली आहे. नाल्यांवर झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे पाण्याचा निचरा न होता थेट सोसायट्यांमध्ये पाणी गेले.
advertisement
5/7
‎छत्रपती संभाजीनगरच्या बजाज कंपनीमध्ये मुसळधार पावसाचं पाणी शिरलेला आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर असल्या या कंपनीत पाण्यातून बाहेर काढाव्या लागतायत. वाळुज एमआयडीसी परिसरातल्या सगळ्याच भागामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. त्या पावसामुळे परिसर जलमय झालेला आहे. बजाजनगर, बजाज कंपनी वाळूज महानगर वाळूज एमआयडीसी, पंढरपूर अनेक घरात पाणी शिरले.
advertisement
6/7
‎छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील तुर्काबाद, वाळूज महानगर एमआयडीसी या परिसरामधला रस्ता पूर्णता पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे पाण्यातूनच वाहन प्रवास करत आहेत. पहाटे मुसळधार पाऊस होता. आता पाऊस थांबला आहे. तरीही रस्त्यावर पाणी तुंबलेला आहे. पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बजाज कंपनीतील समोरचा रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे.
advertisement
7/7
‎सोबतच बजाज कंपनीचा गेट आणि परिसरात सध्या पानाखाली आलेला आहे. या पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल देखील होत आहेत. जनजीवन विस्कळीत झालेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhajinagar Rain : छत्रपती संभाजीनगरमध्ये हाहाकार! कोणाचं घर, कोणाच्या गाड्या पाण्याखाली; मन हेलावून टाकणारे Photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल