आजचं हवामान: उत्तरेकडून वारं फिरलं! सावधान! 4 जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा हायअलर्ट!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असला तरी तापमानात मोठा बदल नाही. धुळे, जेऊर, निफाड, परभणी येथे अति थंडी, अंदमान निकोबार बेटांवर पाऊस, ला निनामुळे थंडी टिकणार.
advertisement
1/7

डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आता थंडीचा कडाटा वाढला आहे. झटपट शेकोटी पेटवा लागलाय खोकला अशी अवस्था झाली आहे. हाडं गोठवणारी जीवघेणी थंडी वाढली आहे. थंडीची लहर आणि दाट धुक्याची परिस्थिती कायम असली तरी, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामानाच्या दृष्टिकोनातून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
सध्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होऊन किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या ७ दिवसांत तापमानात विशेष बदल होणार नाही, पण काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
उत्तर-पश्चिम भारतात पुढील तीन दिवसांत १६ ते १८ डिसेंबर तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर पुढील चार दिवसांत पुन्हा तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. याचा अर्थ महाराष्ट्रावर याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊन थंडीचा कडाका काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत.
advertisement
4/7
हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मोठा बदल होणार नाही. विदर्भ, मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्रासाठी थेट तापमानात फार मोठा बदल अपेक्षित नसला तरी, उत्तर आणि पश्चिम भारतातील बदलांमुळे राज्यातील थंडीची लाट कमी होईल अशी अपेक्षा आहे.
advertisement
5/7
धुळे, जेऊर, निफाड, परभणी या चार जिल्ह्यांमध्ये अति थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये 5-6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हे जाणवत आहे. शिवाय ला निनामुळे जानेवारीपर्यंत ही थंडी कायम राहणार आहे.
advertisement
6/7
महाराष्ट्राला लागून असलेल्या उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर कायम राहणार आहे, ज्यामुळे विमानांचे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होऊ शकते. महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवास करताना किंवा विमानतळावर जाताना, दिल्ली/उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या विमानांच्या वेळेत होणाऱ्या बदलांची माहिती घेणे आवश्यक आहे.
advertisement
7/7
गेल्या २४ तासांत अंदमान बेटांवर एका स्टेशनवर ७ सेंटीमीटर इतका मुसळधार पाऊस नोंदवला गेला आहे. पुढील २४ तासांत अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच १६ आणि १७ डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या किनारी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आजचं हवामान: उत्तरेकडून वारं फिरलं! सावधान! 4 जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा हायअलर्ट!