TRENDING:

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांसारखे गुण तुमच्याकडे असतील तर आयुष्यात यशस्वी व्हाल

Last Updated:
Maharashtra New CM Devendra Fadnavis Skills: फडणवीसांचं हे यश सोपं नक्कीच नव्हतं मात्र त्यांच्यासारखं यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे कोणते गुण असायला हवेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
1/7
देवेंद्र फडणवीसांसारखे गुण तुमच्याकडे असतील तर आयुष्यात यशस्वी व्हाल
मुंबई : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. ते म्हणाले होते मी पुन्हा येईन आणि त्यांनी त्याचं म्हणणं खरं करून दाखवलं. फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 2014, 2019 मध्ये काही तासांसाठी आणि 2024 मध्ये पुन्हा पाच वर्षांसाठी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. फडणवीसांचं हे यश सोपं नक्कीच नव्हतं मात्र त्यांच्यासारखं यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे कोणते गुण असायला हवेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
2/7
आत्मविश्वास- देवेंद्र फडणवीस यांना मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी स्वत: वर विश्वास ठेवला. कुठेही डगमगडले नाहीत, अनेक अडथळे आले तरी स्वत: वरचा विश्वास त्यांनी ढळू दिला नाही. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील युवा तरुणांनी ही शिकण्यासारखी गोष्ट आहे.
advertisement
3/7
सातत्य- बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्टं नाही मिळाली की आशा सोडून दिली जाते किंवा दुसऱ्यावर खापर फोडलं जातं. मात्र यापैकी कोणतीही गोष्ट न करता त्यांनी आपल्या कामात, ध्येय गाठण्यात सातत्य ठेवलं. त्याचं फळ आज त्यांना मिळालं आहे. सातत्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. हार न मानता त्यांनी ती केली.
advertisement
4/7
चिकटी आणि संयम- फडणवीस यांच्याकडून संयम हा घेण्यासारखा आहे. कितीही खालच्या पातळीवर टीका झाली, कितीही डिमोटीव्हेट केलं गेलं तरी सुद्धा संयम राखून चिकाटीने तेवढ्याच फोर्सनं त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं. त्यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. मात्र तिथेही त्यांनी संयम जराही सोडला नाही. आज पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या गादीवर ते बसत आहेत.
advertisement
5/7
अभ्यासू वृत्ती- विषय कितीही खोल असो, कठीण असो किंवा समोर आलेली अडचण अगदी विरोधकांचा पेचही असो, त्यावर अभ्यासूवृत्तीनं संयम राखून उत्तर कसं द्यावं हे फडणवीस यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्याकडे असलेली ही अभ्यासूवृत्ती कायम आपल्याला त्यांच्या भाषणांमधून दिसून येते.
advertisement
6/7
नव्या युगाचा अभिमन्यू - फडणवीस म्हणाले होते मी नव्या युगाचा अभिमन्यू आहे. हे चक्रव्यह भेदणार, त्यांनी त्यांचे शब्द 4 डिसेंबर रोजी खरी करून दाखवली आहे.
advertisement
7/7
संवाद कौशल्य- महायुतीमधील सन्मवय, लोकांशी कसं डील करायचं हे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं आहे. अगदी आमदारांचं बंड असो की महायुतीमधील 'गृह'कलह मुख्यमंत्रिपदावरुन होत असलेली धुसफूस असो माणसांची नस ओळखून त्यांना कसं टॅकल करायचं हे कौशल्य फडणवीस यांच्याकडे उत्तम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांसारखे गुण तुमच्याकडे असतील तर आयुष्यात यशस्वी व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल