धाराशिवचा तलाठी फुल्ल तर्राट! कारनामा पाहून नागरिक धक्क्यात, बघायला तहसील कार्यालयात गर्दी, VIDEO VIRAL
- Published by:Priya Lad
Last Updated:
धाराशिवच्या परंडा तहलीस कार्यालयातील तलाठ्यानं दारूच्या नशेत असं काही केलं आहे की त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जिथं तिथं त्याचीच चर्चा होते आहे. (बालाजी निरफळ, प्रतिनिधी)
advertisement
1/5

सरकारी कार्यालयातील कर्मचारी कामात दिरंगाईसाठी ओळखले जातात. पण सध्या एक तलाठी मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याने असा कारनामा केला आहे की त्याला पाहण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली.
advertisement
2/5
परंडा तहसील कार्यालयाच्या आवारातच हा तलाठी मद्यधुंद अवस्थेत आला. दारू पिऊन तो कार्यालयाच्या दारातच आडवा झोपला. नागरिकांनी त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
advertisement
3/5
त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. वाढती गर्दी पाहता अखेर तहसील प्रशासनाने मद्यधुंद तलाठी महोदयांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
advertisement
4/5
हा तलाठी अनेक महिन्यांपासून कोणतीही सूचना न देता गैरहजर होता.त्याच्या गैरहजरीबद्दल तहसीलदारांनी त्याला नोटीसदेखील बजावली होती.
advertisement
5/5
पण या तलाठ्याने नोटिसीला उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्याची माहिती तहसीलदारांनी माहिती दिली. तहसीलदार यांना जाब विचारण्यासाठी तलाठी दारू पिऊन आला. प्रशासनाने त्याला रुग्णालयात पाठवलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिवचा तलाठी फुल्ल तर्राट! कारनामा पाहून नागरिक धक्क्यात, बघायला तहसील कार्यालयात गर्दी, VIDEO VIRAL