TRENDING:

Modak Demand: तरुणाईत फ्लेवरफुल मोदक हिट, आठवड्यात 10 टनांपेक्षा अधिक मोदकांची विक्री

Last Updated:
Modak Demand: सर्वांचा लाडका गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. त्यामुळे सध्या मिठाईच्या दुकानांमध्ये बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. 'मोदक' हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ मानला जातो. गणेशोत्सवात घरोघरी मोदक बघायला मिळतात.
advertisement
1/5
तरुणाईत फ्लेवरफुल मोदक हिट, आठवड्यात 10 टनांपेक्षा अधिक मोदकांची विक्री
पारंपरिक खव्याचे मोदक असो किंवा आधुनिक चॉकलेट आणि मावा मोदक असो, सर्व प्रकारच्या मोदकांना गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदा गणेशोत्सवात प्रसादासाठी भाविक ड्रायफ्रुट्स, चॉकलेट आणि बटरस्कॉच मोदकांना विशेष पसंती देताना दिसत आहेत.
advertisement
2/5
मुंबईतील दादर, माटुंगा, शिवाजी पार्क, माहीम, प्रभादेवी आणि करी रोड परिसरातील मिठाईची दुकानं सध्या ग्राहकांनी गजबजलेली दिसत आहेत. पारंपरिक उकडीच्या मोदकांबरोबरच चॉकलेट, बटरस्कॉच या फ्लेवरच्या मोदकांना मागणी वाढली आहे.
advertisement
3/5
विशेषत: तरुणाई आणि लहान मुलांना विविध फ्लेवरचे मोदक आवडत आहेत. ड्रायफ्रुट्सचे मोदक जास्त दिवस टिकतात, म्हणून या मोदकांची मागणी देखील वाढली आहे. माव्याचे साधे एक किलो मोदक 800 रुपयांपासून तर विविध फ्लेवरचे ड्रायफ्रुट्स मोदक 1000 रुपयांपासून पुढे मिळत आहेत.
advertisement
4/5
एक किलो प्रीमियम मोदकांसाठी 1200 ते 2500 रुपये मोजावे लागत आहेत. पारंपरित उकडीचे मोदक 30 ते 70 रुपये प्रति नग याप्रमाणे मिळत आहेत. विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काजू, बदाम, पिस्ता, चॉकलेट, मलाई, बटरस्कॉच आणि ड्रायफ्रुट्सचे मोदक ग्राहकांसाठी आकर्षण ठरत आहेत.
advertisement
5/5
दररोज शेकडो किलो मोदक विकले जात असून पुढील दोन दिवसांत ही मागणी आणखी वाढेल. मिठाईच्या विविध दुकानांनी मिळून अवघ्या एका आठवड्यात 10 टनांपेक्षा अधिक मोदकांची विक्री केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Modak Demand: तरुणाईत फ्लेवरफुल मोदक हिट, आठवड्यात 10 टनांपेक्षा अधिक मोदकांची विक्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल