TRENDING:

सह्याद्रीत आढळला वाघापेक्षा खतरनाक प्राणी, दिसायला कुत्रा, पण भल्यामोठ्या गव्याची करतो शिकार, Photo

Last Updated:
Wild Dog: वाघांसाठी संरक्षित असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अत्यंत दुर्मिळ प्राणी आढळला आहे. कुत्र्याएवढा दिसणारा हा प्राणी अगदी गव्याची देखील शिकार करतो.
advertisement
1/7
सह्याद्रीत वाघापेक्षा खतरनाक प्राणी, दिसायला कुत्रा, पण गव्याची करतो शिकार PHOTO
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा जैवविविधतेने अत्यंत समृद्ध भाग आहे. या ठिकाणी दुर्मिळ वनस्पतींसोबतच प्राणी देखील आढळतात. नुकतेच सह्याद्रीच्या बफर झोनमध्ये अंत्यत दुर्मिळ मानला जाणारा काळा रानकुत्रा (मेलेनिस्टिक) आढळला. याबाबत मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी माहिती दिली.
advertisement
2/7
कराडमधील पर्यटक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये असणाऱ्या एका गावात फिरण्यास गेले होते. तेव्हा त्यांना काळा रानकुत्रा दिसला. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या रानकुत्र्याचे व्हीडिओ आणि फोटो घेऊन त्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली.
advertisement
3/7
वनविभागाकडे असणाऱ्या नोंदीनुसार असा रानकुत्रा 1936 मध्ये तामिळनाडूतील कोइम्बतूर वन विभागातील गड्डेसल येथे दिसला होता. शिकारी, निसर्गशास्त्रज्ञ, कॉफी प्लांटर आणि स्कॉट्समन आर.सी. मॉरिस यांनी एका काळा रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक) नोंद केली होती. याला रानकुत्रा किंवा कोळशिंदा (वाईल्ड डॉग) म्हणूनही ओळखलं जातं. ‘कुओन अल्पिनुस’ असं त्याचं शास्त्रीय नाव आहे.
advertisement
4/7
रानकुत्रा हा रंगाने तांबूस लालसर असतो. त्याचे कान टोकाकडे गोलाकार असतात. हनुवटी खालचा भाग पांढरट असतो. तर शेपटीचा टोकाकडील बहुतांश भाग हा काळसर असतो. रानकुत्र्याची उंची 43 ते 45 से.मी.पर्यंत असते तर शरीराची लांबी 3 फुटापर्यंत असते. नराचे वजन 20 किलोच्या आसपास असून मादीचे वजन नरापेक्षा कमी असते. मादी एका वेळी 4 ते 6 पिलांना जन्म देते. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पिल्लं पाहायला मिळतात.
advertisement
5/7
कळपाने राहणाऱ्या या प्राण्याचे वास्तव्य जंगलात दिसून येते. रानकुत्रा कळपाने शिकार करत असल्याने ते मोठ्या व ताकदवर प्राण्यांची शिकार करण्यास मदत होते. हरीण वर्गातील प्राणी हे या प्राण्यांचे आवडीचे खाद्य आहे. कळपातील प्राण्यांचीसंख्या जास्त असल्यास ते अगदी गव्यासारख्या मोठ्या प्रण्याचीसुधा शिकार करतात.
advertisement
6/7
सह्याद्रीत आढळलेला रानकुत्रा हा रंगाने काळा आहे. जीवशास्त्रात मेलेनिस्टिक म्हणजे एखाद्या प्राण्यामध्ये मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्यपणे जास्त प्रमाण असते. त्यामुळे त्याचा रंग नेहमीपेक्षा जास्त गडद होतो. बहुतेकदा तो काळा असतो. सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यासह विविध प्रजातींमध्ये हा अनुवांशिक फरक दिसून येतो. त्यामुळे यापूर्वी अगदी काळा बिबट्या देखील सह्याद्रीत दिसल्याचे मानद वन्यजीव रक्षक भाटे सांगतात.
advertisement
7/7
दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच सदर परिसरात कॅमेरा लावून अधिक माहिती व अभ्यास करण्याच्या सूचना वनरक्षकांना देण्यात आल्या आहेत, असेही भाटे यांनी सांगितले. (फोटो-मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, दिग्विजय पाटील)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
सह्याद्रीत आढळला वाघापेक्षा खतरनाक प्राणी, दिसायला कुत्रा, पण भल्यामोठ्या गव्याची करतो शिकार, Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल