ती, दोस्त आणि सांगाडा, बुलडाण्यात दृश्यम सिनेमाला लाजवेल अशी घटना, तब्बल 2 वर्ष लपवलं, पण...
- Published by:sachin Salve
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यात दृश्यम सिनेमाची पुनरावृत्ती झाल्याची एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यात हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून करून पुरण्यात आलेला मृतदेह तब्बल 2 वर्षानंतर बाहेर काढण्यात आला आहे. (राहुल खंडारे, प्रतिनिधी)
advertisement
1/7

बुलढाणा जिल्ह्यात दृश्यम सिनेमाची पुनरावृत्ती झाल्याची एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यात हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून करून पुरण्यात आलेला मृतदेह तब्बल 2 वर्षानंतर बाहेर काढण्यात आला आहे. हिवरखेड पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
2/7
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक नंदू धंदरे याचा गावातील अतुल कोकरे आणि दीपक ढोके यांनी अनैतिक संबंधातून खून केला होता. त्यानंतर स्वतःच्या शेतात 2 वर्षा पूर्वी पुरल होतं. हिवरखेड पोलिसांनी एका चोरीच्या चौकशी दरम्यान या खुनाचा छडा लावला. दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम करून 2 वर्षापूर्वी मानवी सांगाडा हस्तगत केला आहे. त्यामुळे या प्रकरणात दृश्यम सिनेमातील अनुभव आला आहे.
advertisement
3/7
2 वर्षांनंतर आरोपी कसा सापडला? या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी कैलास चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपी दीपक ढोके याची पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात कसून चौकशी केली असता, त्याने अतुल कोकरेसह खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर फॉरेन्सिक टीम आणि पंचा समक्ष मुख्य आरोपी अतुल कोकरे यांच्या शेतात जाऊन मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खोदकाम करून मृतक नंदू धंदरे याचा मृतदेह बाहेर काढला.
advertisement
4/7
नंदू धंदरेचा खून का केला? - सहआरोपी दीपक ढोके याने दिलेल्या माहितीवरून मृतक नंदू धंदरे आणि मुख्य आरोपी अतुल कोकरे याचे एकाच महिलेसोबत प्रेम संबंध होते. त्यामुळे अतुल कोकरे याने नंदू धंदरे याला फावड्याच्या दांड्याने डोक्यात मारून खून केला.
advertisement
5/7
त्यानंतर त्याचा मृतदेह स्वतःच्या शेतात पुरून त्याची मोटर सायकल मेहकर तालुक्यातील एका नदीत टाकून दिल्याची कबुली दिली. त्याच्या कबुली जबाबावरून वरून पोलिसांनी अतुल कोकरेच्या शेतात खोदकाम करून नंदू धंदरेचा सांगाडा हस्तगत करून उत्तरीय तपासणीसाठी फॉरेन्सिक टीम पाठवण्यात आला.
advertisement
6/7
या संपूर्ण खून प्रकरणाचा तपास आणि मृतकाचा सांगाडा आणि खुनाचा पोलिसांकडून केला गेलेला पाठलाग हिंदी सिनेमा दृश्यंम आठवण करून गेला. त्यामुळे आरोपी कितीही हुशार असला तरी तो सिनेमातच स्वतःला वाचवू शकतो. वास्तवात नाही, हेच य प्रकरणातून सिद्ध होते.
advertisement
7/7
आरोपी अतुल कोकरे, दीपक ढोके आणि मृतक नंदू धंदरे यांचे फोटो. या प्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मागील 2 वर्षांपासून दोघेही आरोपी गावात निवांत फिरत होते. अखेरीस एका चोरीमुळे दोघे गजाआड झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ती, दोस्त आणि सांगाडा, बुलडाण्यात दृश्यम सिनेमाला लाजवेल अशी घटना, तब्बल 2 वर्ष लपवलं, पण...