Godavari River News : नागपूरच्या 2 युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू; एक निर्णय बेतला दोघांच्या जीवावर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Godavari River News : नागपूरच्या दोन युवकांचा गडचिरोली येथील गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. (महेश तिवारी, प्रतिनिधी)
advertisement
1/5

गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात दोन युवकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यु झाला. सुमन राजू मारसेट्टी (वय 15, रा. आसरअल्ली) आणि हिमांशू मून (वय 22, रा. न्यू बालाजी नगर) नागपूर अशी मृतकांची नावे आहेत.
advertisement
2/5
हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता.
advertisement
3/5
दरम्यान, आज तो आपल्या मित्रांसह सुमन मारसेट्टी याला भेटण्यासाठी सिरोंचापासून 8 किमी अंतरावरील चिंतलपल्ली येथे गेला. येथून हिमांशू तसेच सुमन यांच्यासह पाच जण गोदावरी नदीवरील नगरम घाटाकडे आंघोळीचा बेत करून निघाले.
advertisement
4/5
येथे गेल्यानंतर आंघोळीसाठी सर्वजण नदीपात्रात उतरले. पावसामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने सुमन मारसेट्टी व हिमांशू मून आणि अन्य एकजण खोल पाण्यात बुडू लागले.
advertisement
5/5
अन्य एक व इतर दोघे असे तिघेजण कसेबसे पाण्याबाहेर निघाले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाने हिमांशू आणि सुमन दूर वाहत जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गडचिरोली/
Godavari River News : नागपूरच्या 2 युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू; एक निर्णय बेतला दोघांच्या जीवावर