Ratnagiri Whale : गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर परत आलं व्हेलचं पिल्लू, Photo
- Published by:Shreyas
Last Updated:
गणपतीपुळे येथील जीवनदान दिलेल्या व्हेल माशाचा पिल्लाचं पुन्हा एकदा दर्शन झालं आहे. गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा व्हेल माशाचं पिल्लू दिसलं आहे. स्थानिकांना हे पिल्लू निदर्शनास आलं. खोल समुद्रात न जाता व्हेलचं पिल्लू समुद्रकिनारी आलं.
advertisement
1/5

<a href="https://news18marathi.com/maharashtra/whale-that-came-to-ganpatipule-beach-died-mhsz-1079145.html">व्हेलचं पिल्लू जखमी असल्यामुळे</a> पाण्याच्या प्रवाहाने परत बाहेर आलं. दोन दिवस किनाऱ्यावर राहिल्यामुळे पिल्लू उपाशी आहे, त्यामुळे ते अशक्त होऊन परत समुद्रकिनारी आलं.
advertisement
2/5
प्रशासनाने अथक प्रयत्नानंतर <a href="https://news18marathi.com/maharashtra/ratnagiri-news-finally-baby-whale-was-rescued-after-30-hours-watch-the-video-mhsz-1078599.html">व्हेल माशाचं पिल्लू</a> समुद्रात सोडलं होतं, पण पुन्हा एकदा पिल्लू दिसल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. व्हेलचं पिल्लू पुन्हा दिसल्यामुळे प्रशासन परत एकदा ऍक्शन मोडवर आलं आहे. गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात होणार आहे.
advertisement
3/5
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रात <a href="https://news18marathi.com/photogallery/kokan/whale-fish-on-ganpatipule-beach-rescue-operation-continue-see-photo-mhsy-1078306.html">व्हेल माशाचं पिल्लू</a> वाहून आलं होतं. वनविभागाने 30 तासांच्या अथक प्रयत्नानंतर व्हेल माशाच्या पिल्लाला जीवनदान दिलं आणि पुन्हा समुद्रात सोडलं.
advertisement
4/5
समुद्रात भरतीला सुरुवात झाली होती. यावेळी रेस्क्यू टीमनं खोल समुद्रात माशाला नेलं आणि त्याला समुद्रात सोडलं. टीमनं माशाला नेण्यासाठी jsw च्या डग ची मदत घेतली .
advertisement
5/5
वीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतका वजनाचं या व्हेल माश्याचं पिल्लू होतं. ओहोटी असल्यामुळे पिल्लाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते, पण प्रशासनाने व्हेलच्या पिल्लाला समुद्रात सोडलं होतं. आता पुन्हा एकदा पिल्लू दिसून आल्यामुळे प्रशासन परत कामाला लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ratnagiri Whale : गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर परत आलं व्हेलचं पिल्लू, Photo