TRENDING:

दगडाला देवपण देणारे राजस्थानी हात! शिवलिंगाला मोठी मागणी, काय आहे खास?

Last Updated:
Stone Idols: महाशिवरात्री आणि श्रावण महिना यामध्ये महादेवाच्या शिवलिंगाला विशेष मागणी असते. जालन्यात दगडापासून ते बनवण्याचं काम राजस्थानी कलाकार करतात.
advertisement
1/7
दगडाला देवपण देणारे राजस्थानी हात! शिवलिंगाला मोठी मागणी, काय आहे खास?
‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. हातात छन्नी आणि हातोडा घेऊन काळ्या पाषाणाला देवपण देणाऱ्या राजस्थानी शिल्पकारांकडे पाहिल्यानंतर त्याचीच प्रचिती येते. ओबडधोबड दगडांना आखीव रेखीव आकार देऊन सुंदर आकर्षक मूर्ती घडवण्याचं काम राजस्थानी कारागीर मागील 20 वर्षांपासून करतात.
advertisement
2/7
राजस्थानी कलाकार कोणत्याही देवी देवतांची मूर्ती ते हुबेहूब घडवतात. पाषाणाबरोबरच वेगवेगळ्या दगडामध्ये मूर्ती घडवण्याचं त्यांचं काम जालन्यात 365 दिवस सुरू असतं. बरोबरच घरगुती वापरातील पाटा वरवंटा, खलबत्ता यासारख्या दगडी वस्तू देखील ते बनवून देतात. लोकल18 च्या माध्यमतून या कलाकारांबातच जाणून घेऊया.
advertisement
3/7
गोलू सिंग चव्हाण हे 20 वर्षांपूर्वी पोट भरण्यासाठी जालना शहरामध्ये आले. शहरातील नवीन मुंडा परिसरात असलेल्या रस्त्यालगत मोकळ्या जागेत त्यांनी आपलं बस्तान बसवलं. मागील 20 वर्षांपासून वर्षभर ते मूर्ती घडवण्याचं काम करतात.
advertisement
4/7
मध्य प्रदेश येथील काही कारागीर देखील त्यांच्यासोबत आहेत. वेगवेगळ्या दगडांमध्ये नागरिकांच्या मागणीप्रमाणे मूर्ती घडवून देणे हे त्यांचे काम. अगदी एखाद्या व्यक्तीचा फोटो दिल्यास त्याचीही हुबेहूब मूर्ती घडवण्याची कला गोलू सिंग यांच्याकडे आहे.
advertisement
5/7
महाशिवरात्री आणि श्रावण महिना यामध्ये महादेवाच्या शिवलिंगाला विशेष मागणी असते. तर वर्षभर खंडेराया, तुकाराम महाराज, संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, श्री गणेश, नंदी आदी मूर्तींना मोठी मागणी असते.
advertisement
6/7
केवळ एक फुटापासून ते 21 फुटापर्यंतची दगडी मूर्ती गोलूसिंग आणि त्यांचे सहकारी ऑर्डर प्रमाणे तयार करून देतात. त्याचबरोबर घरगुती वापरातील विविध दगडी वस्तू देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. पाटा, वरवंटा, उखळ, खलबत्ता, कपडे धुण्यासाठी दगड, तुळशी वृंदावन अशा प्रकारच्या वस्तू देखील ते बनवून देतात.
advertisement
7/7
20 वर्षांपासून जालना शहरात मूर्ती घडवण्याचं काम आम्ही अविरतपणे करत आहोत. जालना जिल्ह्याबरोबरच विदर्भातील तसेच मराठवाड्यातील लोकही इथे मूर्ती घेण्यासाठी येतात. ऑर्डर प्रमाणे मूर्ती बनवून दिले जाते. त्याचबरोबर मूर्ती बनवून त्याची विक्री देखील केली जाते. 5 हजारांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. या कामात मेहनत खूप आहे. मात्र ईश्वराच्या कृपेने व्यवसाय देखील चांगला होत असल्याचे गोलू सिंग चव्हाण यांनी सांगितलं. (नारायण काळे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
दगडाला देवपण देणारे राजस्थानी हात! शिवलिंगाला मोठी मागणी, काय आहे खास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल