Bigg Boss Marathi 6 : हा राकेश असाच आहे! विशालसोबतच्या राड्यानंतर EX वाइफ रिद्धी डोगराने दाखवला RB खरा चेहरा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Raqesh Ex Wife Ridhi : बिग बॉस मराठी 6 च्या घरात राकेश आणि विशालच्या राड्यावर आरबीची एक्स वाइफ रिद्धी डोगराची पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरातील राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यातील वाद सध्या चांगलाच पेटला आहे. सोशल मीडियावरही याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
advertisement
2/7
बापट कुटुंबाने थेट प्रसिद्धीपत्रक जारी करत विशालने शाब्दीकच नव्हे तर हाणामारीपर्यंत पोहोचून नियमाचा भंग केल्याचं म्हणत त्याच्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
3/7
बहुतेक नेटिझन्सही आरबीच्या समर्थनार्थ उतरले आहेत. राकेशला आपला पाठिंबा आहे, विशालवर कारवाई करा, त्याला घराबाहेर काढा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
advertisement
4/7
राकेश आणि विशाल यांच्यात वाद झाला होत आरबीच्या घटस्फोटावरून. राकेशने विशालला तो आपल्या आणि घरातील इतर सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत असल्याचं सांगून नॉमिनेट केलं. यानंतर विशालने त्याच्या घटस्फोटाचा मुद्दा उकरून काढला आणि राकेश संतापला. त्यांच्यातील वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
advertisement
5/7
दरम्यान आता या वादावर राकेशची एक्स वाइफ रिद्धी डोगरानेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने सुरुवातीला विशालच्या वागणुकीवर हे असं स्वीकारलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
6/7
तसंच ती राकेशबाबतही व्यक्त झाली आहे. "हीच ती व्यक्ती जिला आम्ही ओळखतो. हा राकेश असाच आहे", अशा आशयाची स्टोरी तिने पोस्ट केल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
advertisement
7/7
तसंच "तो पुन्हा मागे हटेल की काय याची काळजी आम्हाला वाटत होती. पण यावेळी त्याने कमाल केली, त्याने जिंकलं. राकेश जबरदस्त खेळत आहे, मला त्याचा खूप अभिमान आहे. मी नेहमीच त्याच्या पाठिशी आहे." असं म्हणत रिद्धीने कायम राकेशला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : हा राकेश असाच आहे! विशालसोबतच्या राड्यानंतर EX वाइफ रिद्धी डोगराने दाखवला RB खरा चेहरा