हिंदू घरातून निघाली मुस्लीम व्यक्तीची अंत्ययात्रा, खान बाबासाठी ओक्साबोक्सी रडलं कुटुंब, 60 वर्षे जपलं नातं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे.
advertisement
1/9

जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे.
advertisement
2/9
इथं देवरे-सोनार कुटुंबात तब्बल ६० वर्षे सेवा देणाऱ्या कासमपूर खान उर्फ 'खान बाबा' (वय १००) यांच्या निधनानंतर, त्यांची अंतिम यात्रा चक्क एका हिंदू कुटुंबाच्या घरातून काढण्यात आली. रक्ताच्या नात्यापेक्षाही जीवाभावाचे नाते श्रेष्ठ असते, याची प्रचीती या घटनेने दिली आहे.
advertisement
3/9
खान बाबा हे मुस्लिम समाजातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते. तरुणपणी ते यावल येथील देवरे-सोनार यांच्या सराफी पेढीत कारागीर म्हणून रुजू झाले. ते त्या कुटुंबाचा अविभाज्य हिस्सा बनले.
advertisement
4/9
दोन पिढ्या उलटल्या तरी खान बाबांचा या कुटुंबातील मान एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीसारखा होता.
advertisement
5/9
उतारवयात काम सुटल्यानंतर देवरे-सोनार कुटुंबाने त्यांना कधीही परके मानले नाही, त्यांची शेवटपर्यंत सेवा केली.
advertisement
6/9
मंगळवारी खान बाबांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देवरे-सोनार कुटुंबाने खान बाबा हे कुटुंबाचेच सदस्य असल्याने त्यांची अंत्ययात्रा स्वतःच्या घरातूनच निघेल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
advertisement
7/9
विधी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे पार पडले, तरी खांदा देवरे-सोनार कुटुंबीयांनी त्यांना दिला.
advertisement
8/9
खान बाबा यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पुणे आणि मुंबई येथील देवरे-सोनार कुटुंबाची मुलं, मुली, जावईही आले होते. त्यांना खान बाबांचं दर्शन मिळावं म्हणून त्यांचा जनाजा एक दिवस उशिरा काढण्यात आला.
advertisement
9/9
कय्यूम खान बाबा हे जळगाव शहरातील काजीपुरा भागातील मूळचे रहिवासी असून ते मुस्लिम समाजाचे असल्याने त्यांच्यावर मुस्लिम धर्मपद्धती नुसार अंत्यविधी करण्यात आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
हिंदू घरातून निघाली मुस्लीम व्यक्तीची अंत्ययात्रा, खान बाबासाठी ओक्साबोक्सी रडलं कुटुंब, 60 वर्षे जपलं नातं