TRENDING:

Kolhapur Rain: कोल्हापूरला पुन्हा हायअलर्ट, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, हे बंधारे पाण्याखाली!

Last Updated:
Kolhapur Rain: हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी शनिवार (दि. 14) पासून मंगळवार (दि. 17) पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.
advertisement
1/7
कोल्हापूरला पुन्हा हायअलर्ट, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, हे बंधारे पाण्याखाली!
गेल्या 2 दिवसांत कोल्हापुरात पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी शहरात अधूनमधून हलक्या सरी, ढगाळ वातावरण आणि उन्हाचा तडाखा असे मिश्र वातावरण पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत शहरात 69 मि.मी. पाऊस, तर जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सरासरी 39.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.
advertisement
2/7
हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी शनिवार (दि. 14) पासून मंगळवार (दि. 17) पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजता नदीची पाणी पातळी 13 फूट 5 इंचांवर पोहोचली होती. इचलकरंजी आणि रुई येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
advertisement
3/7
शुक्रवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत होता, तर सायंकाळी जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली होती. हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्टमुळे मोठ्या पावसाची अपेक्षा होती; मात्र, पावसाने काहीशी हुलकावणी दिली. शहराच्या काही भागांत हलक्या सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहिला.
advertisement
4/7
गुरुवारी पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. याशिवाय शिरोळ, शाहूवाडी, करवीर, आणि कागल तालुक्यांतील काही गावांमध्येही अतिवृष्टीने हाहाकार उडाला. या पावसामुळे शेतजमिनी जलमय झाल्या, तर काही ठिकाणी रस्ते आणि घरांमध्ये पाणी शिरले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.
advertisement
5/7
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. ऑरेंज अलर्टमुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
6/7
पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच, रस्त्यांवरील पाणी साचण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेची पथके कार्यरत आहेत. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने, सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
advertisement
7/7
स्थानिक नागरिकांनी पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. पावसाचा जोर पाहता, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने कळवले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Rain: कोल्हापूरला पुन्हा हायअलर्ट, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, हे बंधारे पाण्याखाली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल