TRENDING:

11 एकर जमीन, तब्बल 35 टन रांगोळी, साडेचार लाख स्क्वेअर फुटांमध्ये साकारली छत्रपती शिवरायांची रांगोळी

Last Updated:
ही विशेष रांगोळी छत्रपती शिवरायांची असून तब्बल 11 एकरामध्ये ही रांगोळी साकारण्यात आली आहे. कोल्हापुरातील वारणानगर परिसरामध्ये आजवरची सर्वात मोठी रांगोळी साकारली आहे.
advertisement
1/5
तब्बल 35 टन रांगोळी,साडेचार लाख स्क्वेअर फुटांमध्ये साकारली शिवरायांची रांगोळी
राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने कोल्हापुरातील वारणानगर इथं विश्वविक्रमी रांगोळीचे आयोजन करण्यात आलं. ही विशेष रांगोळी छत्रपती शिवरायांची असून तब्बल 11 एकरामध्ये ही रांगोळी साकारण्यात आली आहे. कोल्हापुरातील वारणानगर परिसरामध्ये आजवरची सर्वात मोठी रांगोळी साकारली आहे. या रांगोळीसाठी तब्बल 35 टन रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.
advertisement
2/5
ही रांगोळी जवळपास साडे चार लाख स्क्वेअर फुटांची आहे. विशेष म्हणजे आजवर साडे चार लाख स्क्वेअर फुट इतकी भव्य रांगोळी कोणीही साकारण्याचा प्रयत्न केला नव्हता.या रांगोळीची विश्वविक्रमात नोंद सुद्धा होणार आहे. यासाठी पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारातून ही रांगोळी साकारण्यात आली आहे. या उपक्रमासाठी 350 महिला आणि विद्यार्थी यांचा हातभार लाभला आहे.
advertisement
3/5
ही संकल्पना शिक्षक समीर काळे यांच्या मेहनतीतून साकारली गेली. या उपक्रमासाठी वारणा संघाकडून मोलाचं सहकार्य लाभलं आहे.या रांगोळीचे काम गेले 15 ते 20 दिवसांपासून सुरू होतं अनेक लोकांनी ह्या उपक्रमासाठी सढळ हाताने मदत केली. या ठिकाणी मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातूनही लोकांना ही रांगोळी पाहता येणार आहेत.
advertisement
4/5
नवे पारगाव येथे तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कूल या सैनिक शाळेच्या पटांगणावर भव्य छत्रपती शिवरायांची उभी प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारण्यात आलीय. ही रांगोळी तब्बल साडेचार लाख स्क्वेअर फुटांची असून, जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आल्याचा दावा आयोगानं केलाय.
advertisement
5/5
तर या कार्यक्रमाला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रिकॉर्डच्या अधिकाऱ्यांची समिती यावेळी उपस्थित होती. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रांगोळीची विश्व विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
11 एकर जमीन, तब्बल 35 टन रांगोळी, साडेचार लाख स्क्वेअर फुटांमध्ये साकारली छत्रपती शिवरायांची रांगोळी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल