एक क्लिक हजार शब्दांचा, तुम्हीच निवडा बेस्ट PHOTO
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापुरातील छायाचित्रकारांचे खास फोटो पाहिलेत का? तुम्हीच निवडा बेस्ट फोटो...
advertisement
1/15

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापुरात कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर यांच्या वतीने अवतीभवती छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
advertisement
2/15
कोल्हापुरातील 20 वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलेली 100 पेक्षा जास्त छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
advertisement
3/15
दिनांक 19 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत कोल्हापुरात दसरा चौक परिसरातील शाहू स्मारक भवन येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
advertisement
4/15
दरम्यान नागरिकांनी अवतीभवती हे छायाचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.
advertisement
5/15
यामध्ये सचिन तेंडुलकर आणि बालमित्र विनोद कांबळी यांचे मुक्त छायाचित्रकार राजा उपळेकर यांनी टिपलेले एक छायाचित्र प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.
advertisement
6/15
डेक्कन ओडिसी या रेल्वेमधून अनेक परदेशी पाहुणे कोल्हापुरात येत असत. त्यांच्या समोर चित्तथरारक मैदानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवतानाचा एक क्षण मुक्त छायाचित्रकार संजय देसाई यांनी टिपला आहे.
advertisement
7/15
एकीकडे कोल्हापुरच्या रंकाळ्यावरील रम्य संध्याकाळ तर दुसरीकडे शहर परिसरात एक माऊलीचे कष्ट दर्शविणारे क्षण तरुण भारत या वृत्तपत्राचे छायाचित्रकार इम्रान गवंडी यांनी टिपलेत
advertisement
8/15
जंगलचा राजा वाघोबाची ऐटच न्यारी असे शीर्षक देत ताडोबा अभयारण्यातील व्याघ्र दर्शनाचा योग पुढारी वृत्तपत्राचे छायाचित्रकार नाज ट्रेनर यांनी छायाबद्ध केला आहे.
advertisement
9/15
कोल्हापुरात टोल विरोधात आंदोलन पेटले असताना ओंदोलनाच्या उद्रेकाचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम मुक्त छायाचित्रकार मालोजी केरकर यांनी टिपला आहे.
advertisement
10/15
कोल्हापुरात तयार होणारा उत्तम प्रतीचा गुळ बनवण्यामागे असणाऱ्या हातांना गुळाचा इंजिनियर हे शीर्षक देत हे दैनिक सकाळचे छायाचित्रकार बी. डी. चेचर यांनी छायाचित्र काढले आहे.
advertisement
11/15
छोट्या खांद्यावर मोठा भार असे म्हणत कोल्हापुरातील ऊस तोड मजूर आणि त्यांच्या मुलांची व्यथा छायाचित्राच्या रुपात टाइम्स ऑफ इंडियाचे छायाचित्रकार राहुल गायकवाड यांनी मांडली आहे.
advertisement
12/15
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळ्याच्या आणि सूर्यग्रहणा वेळच्या छटा दैनिक पुढारीचे छायाचित्रकार टाकळकर यांनी टिपल्या आहेत.
advertisement
13/15
झोपडीत भलेही अंधार असला, तरी शिक्षण घेण्यासाठीची ओढ दर्शविणारे ऑनलाइन शिक्षण पद्धतीतील क्षण दर्शवणारे छायाचित्र दैनिक तरुण भारतचे छायाचित्रकार रियाज ट्रेनर यांनी टिपले आहे
advertisement
14/15
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी असणाऱ्या शेकरू या प्राण्याचे सुंदर असे छायाचित्र अनिल वेल्हाळे यांनी टिपले आहे.
advertisement
15/15
कोल्हापूर जिल्ह्याला 1989 नंतर 2005 साली प्रथमच प्रलयकारी महापूराचा तडाखा बसला होता. यावेळी ड्रोनचे प्रमाण कमी असताना भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मधून पप्पू अत्तार यांनी महापूराचे रौद्ररूप टिपलेले होते.