TRENDING:

MJP Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी निघाली भरती; पात्रता काय?

Last Updated:
रोजगाराच्या नवीन संधी शोधात असणाऱ्या बेरोजगार तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेली नोकर भरती एकूण 290 पदांवर होणार आहे. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार mjp.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अनेक वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होणार आहे. कोणकोणत्या पदांसाठी नोकररती केली जाणार आहे, जाणून घेऊया...
advertisement
1/6
महाराष्ट् जीवन प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती; पात्रता काय
रोजगाराच्या नवीन संधी शोधात असणाऱ्या बेरोजगार तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (Maharashtra Jeevan Pradhikaran) गेल्या महिन्यामध्ये नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. नोकर भरतीच्या शेवटच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज भरलेला नाही, त्यांना आता मुदतवाढ मिळाली आहे.
advertisement
2/6
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या नोकर भरतीची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2025 असणार आहे. एकूण 290 पदांसाठी भरती केली जाणार आहे. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार mjp.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अनेक वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होणार आहे. कोणकोणत्या पदांसाठी नोकररती केली जाणार आहे, जाणून घेऊया...
advertisement
3/6
गट- अ, गट- ब आणि गट- क अशा तीनही वेगवेगळ्या पदांसाठी 290 रिक्त पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. बातमीमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी जाहिरातीच्या PDF ची लिंक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे. भरती संबंधित अधिकाधिक माहितीसाठी अर्जदाराने भरतीची PDF एकदा आवश्य वाचावी, त्याप्रमाणेच अर्ज करायचा आहे.
advertisement
4/6
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार असून फी भरण्याची पद्धत सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. 01 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्जदाराने 18 ते 45 वय पूर्ण केलेले असावे. मागासवर्गीय उमेदवारांना, आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना आणि अनाथ उमेदवारांना 05 वर्षांची वयामध्ये सूट असेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नोकर भरती पार पडणार आहे.
advertisement
5/6
ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक- <span style="color: #3366ff;"></span>जाहिरात PDF ची लिंक- <span style="color: #3366ff;"></span>
advertisement
6/6
खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रूपये फी असून मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांना 900 रूपये फी आहे. इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवारांसाठी कोणकोणत्या रिक्त पदांवर अर्ज करू शकता, ही सविस्तर माहिती जाहिरातीमध्येच मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
MJP Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी निघाली भरती; पात्रता काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल