TRENDING:

Maratha Reservation : कुठे तोडफोड तर कुठे जाळपोळ, मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर राजकीय नेते, घटनास्थळावरचे PHOTOS

Last Updated:
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनाचे तीव्र पडसाद बीड जिल्ह्यात उमटले आहेत. बीडमध्ये आंदोलकांनी सर्वपक्षीय नेते आणि आमदारांचं घर आणि कार्यालयं जाळली आहेत.
advertisement
1/11
कुठे तोडफोड तर कुठे जाळपोळ, मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर नेते, घटनास्थळाचे Photo
माजलगावमध्ये आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ केली.
advertisement
2/11
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर, कार्यालय आणि बंगल्यावर दगडफेक करून पेटवण्यात आलं.
advertisement
3/11
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय आणि बंगला आंदोलकांनी पेटवून दिला.
advertisement
4/11
राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड शहरातील कार्यालयही पेटवण्यात आलं.
advertisement
5/11
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचं कार्यालय फोडून फर्निचर पेटवण्यात आलं.
advertisement
6/11
छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आणि समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांचं सनराईज हॉटेल आंदोलकांनी फोडून पेटवलं.
advertisement
7/11
प्रकाश सोळंके यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांचा बीड शहरातील सुंदर बंगला आंदोलकांनी पेटवला.
advertisement
8/11
शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे यांचं नगर नाक्यावरील कार्यालयही आंदोलनकर्त्यांनी फोडलं.
advertisement
9/11
बीड नगर परिषदेच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला.
advertisement
10/11
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरावर दगडफेक करत असताना पोलिसांनी आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.
advertisement
11/11
बीआरएसचे जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा गोरे यांचं ऑफिसची तोडफोड करून खुर्च्या आणि फर्निचरला आग लावण्यात आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maratha Reservation : कुठे तोडफोड तर कुठे जाळपोळ, मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर राजकीय नेते, घटनास्थळावरचे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल