TRENDING:

Photo: नजर जाईल तिकडे गाड्याच गाड्या, मॅपवर पाहिलं तर लालभडक रेषा, धडकी भरवणारे 'एक्सप्रेसवे'चे फोटो

Last Updated:
Mumbai Pune Expressway Traffic: समोर आलेल्या फोटोंनुसार नजर जाईल तिकडे फक्त गाड्याच दिसत आहेत. वाहतूक कोंडीचा गुगल मॅपवर अंदाज घेतला तर सावधान करणारी लालभडक रेषा दिसत आहे.
advertisement
1/6
नजर जाईल तिकडे गाड्याच गाड्या, मॅपवर पाहिलं तर लालभडक रेषा, धडकी भरवणारे Photo
अनिस शेख, गणेश दुडम, प्रतिनिधी, लोणावळा (पुणे) : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. जवळपास गेल्या २३ तासांपासून हजारो गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत.
advertisement
2/6
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने मोठी गळती सुरू होती. काल दुपारी चार, साडे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तेव्हापासून द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली. अपघाताच्या २२ तासानंतरही वाहनांच्या रांगा ५० किमीपर्यंत आहेत.
advertisement
3/6
परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
advertisement
4/6
मागील २१ तासांपासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हालअन्न पाण्याविना हाल होत असून प्रवासी अनेकजण मेटाकुटीला आले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
advertisement
5/6
समाज माध्यमांतून समोर आलेल्या फोटोंनुसार नजर जाईल तिकडे फक्त गाड्याच दिसत आहेत. वाहतूक कोंडीचा गुगल मॅपवर अंदाज घेतला तर सावधान करणारी लालभडक रेषा दिसत आहे. वैमानिक नितीन वेलडे यांनी विमानातून वाहतूक कोंडीचे फोटो काढले आहेत.
advertisement
6/6
पुणे एक्स्प्रेस वे वाहतुक कोंडीमुळे पुण्यातील रेल्वे स्टेशनवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्या पकडण्यासाठी प्रवाश्यांची झुंबड उडाली आहे. एखाद्या मोर्चाला जत्थेच्या जत्थे निघावेत, तसे प्रवासी पुणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Photo: नजर जाईल तिकडे गाड्याच गाड्या, मॅपवर पाहिलं तर लालभडक रेषा, धडकी भरवणारे 'एक्सप्रेसवे'चे फोटो
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल