TRENDING:

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, हडपसर–दिवेघाट मार्ग 3 तास वाहतुकीसाठी राहणार बंद, कारण काय?

Last Updated:

पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, त्यासाठी दिनांक 05 फेब्रुवारी रोजी दिवेघाट परिसरात ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. या कामामुळे संबंधित मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक 
वाहतूक 
advertisement

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत हडपसर ते दिवेघाट या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्यात येईल. ब्लास्टिंगदरम्यान नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या वेळेत या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Online शेतमाल विकताय? हा स्कॅम तुमच्यासोबतही होऊ शकतो, हे एकदा वाचाच

advertisement

आळंदी–पंढरपूर पालखी महामार्ग हा धार्मिक तसेच दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असल्याने, ब्लास्टिंगमुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. विशेषतः अवजड वाहने, खासगी बस, मालवाहतूक करणारी वाहने तसेच प्रवासी वाहनांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा, असेही सांगण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने हे काम करण्यात येत असून, रस्ता रुंदीकरणामुळे भविष्यात वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, कामाच्या कालावधीत पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, घाई न करता पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

मराठी बातम्या/पुणे/
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, हडपसर–दिवेघाट मार्ग 3 तास वाहतुकीसाठी राहणार बंद, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल