TRENDING:

विदर्भातील किमान तापमानात वाढ, थंडीचा जोर कमी होणार का? पाहा आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Vidarbha Weather Update: विदर्भातील किमान तापमानात वाढ झाल्याने वातावरणात बदल घडून आलेत. विदर्भातील ढगाळ वातावरण गायब होऊन मुख्यतः निरभ्र आकाश असल्याचे पाहायला मिळणार आहे. 
advertisement
1/5
विदर्भातील किमान तापमानात वाढ, थंडीचा जोर कमी होणार का? पाहा आजचा हवामान अंदाज
गेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी थंडीचा जोर वाढलेला दिसून येत होता. विदर्भातही थंडीचा जोर खूप जास्त असलेला पाहायला मिळाला. मात्र, आता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भात थंडीचा जोर थोडा कमी झालाय. गेल्या काही दिवसांत विदर्भातील किमान तापमानात 9 ते 10 अंशावर गेलेले दिसून आले.
advertisement
2/5
आता मात्र त्यात 4 ते 5 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. 20 डिसेंबर रोज शुक्रवारला विदर्भातील सर्व जिल्ह्यांत निरभ्र आकाश असणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही. त्याचबरोबर काही जिल्ह्यातील कमाल तापमान वाढ झाल्याने वातावरणात दमटपणा देखील जाणवण्याची शक्यता आहे. आज 20 डिसेंबरला नागपुर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
3/5
गोंदिया जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. त्याचबरोबर बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर वाशिम जिल्ह्यातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
4/5
भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. काही दिवस आधी विदर्भातील किमान तापमान हे 9 ते 12 अंश सेल्सिअस या दरम्यान होते. आता ते 13 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याचे दिसून येत आहे. सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झाल्याने विदर्भात आता थंडीचा जोर कमी होताना दिसून येत आहे.
advertisement
5/5
त्याचबरोबर ढगाळ वातावरण सुद्धा गायब होऊन आता हलका सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता आता थोडी कमी होण्यास मदत होणार आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांत तूर आणि कापूस पिकाचे बहुतांश नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरण आणि थंडीचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भातील किमान तापमानात वाढ, थंडीचा जोर कमी होणार का? पाहा आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल