विदर्भात गारठा वाढला, नागपूर आणि गोंदियातील पारा घसरला, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भात थंडीचा जोर आणखी वाढलाय. नागपूर आणि गोंदियातील पारा 13 अंश सेल्सिअसवर आलाय. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
1/5

संपूर्ण राज्यात थंडीची हुडहुडी जाणवायला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भात पारा 13 अंश सेल्सिअसवर आलाय. सर्वच भागांत दिवसेंदिवस तापमानात घट होत आहे. विदर्भातही थंडीचा जोर कायम आहे. विदर्भात पुढील काही दिवस कोरडे हवामान असणार आहे.
advertisement
2/5
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र, थंडीचा जोर वाढणार आहे. आज 21 नोव्हेंबरला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील वातावरण कोरडे राहून निरभ्र आकाश असणार आहे. वाशिम, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यातील किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअस इतके असेल.
advertisement
3/5
अमरावती, वर्धा, बुलढाणा,भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस इतके आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका आणखी वाढलाय. गोंदिया, नागपूर, या जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके आहे. या जिल्ह्यातील तापमानात सर्वाधिक घट झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement
4/5
त्यामुळे नागपूर, गोंदिया येथील नागरिकांनी आता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. त्यामुळे विदर्भात आता कडाक्याची थंडी जाणवणार आहे. काही भागांत पहाटेच्या वेळी आणि सायंकाळी थंडी जाणवेल. तर काही भागांत दिवसभर हलका थंडावा जाणवणार आहे.
advertisement
5/5
वातावरणात एकाएकी बदल झाल्याने आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आता गरम कपड्यांचा वापर करणे सुरू करावे. थंडीचा जोर वाढत असल्याने आता तूर पिकावर दव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता तूर पिकाची काळजी घेऊन योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात गारठा वाढला, नागपूर आणि गोंदियातील पारा घसरला, हवामान विभागाचा अलर्ट