विदर्भात दाट धुक्यासह ढगाळ वातावरण! भंडारा, गोंदियात हुडहुडी, कितीवर घसरला पारा?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भातील दोन जिल्ह्यांत थंडीचा जोर कायम आहे. संपूर्ण विदर्भात धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम असेल.
advertisement
1/5

राज्यात विविध ठिकाणी थंडीचा जोर वाढलाय. विदर्भातही दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत आहे. विदर्भात किमान तापमान 13 अंश सेल्सिअसवर आले आहेत. राज्यात सर्वत्र धुके आणि ढगाळ वातावरण असल्याचे दिसून येत आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी पुढील काही दिवस धुक्यासह ढगाळ आकाश राहणार आहे. कुठेही पावसाची शक्यता नाही.
advertisement
2/5
आज 25 नोव्हेंबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यांत धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. अमरावती किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर अकोला, बुलढाणा,चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअस इतके असेल. काही दिवस आधी या जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा 13 ते 14 अंश सेल्सिअस वर घसरला होता.
advertisement
3/5
आता मात्र किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. वातावरणात सतत बदल होत आहे. नागपूर, वर्धा या दोन जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके आहे. या जिल्ह्यातील किमान तापमान कालपर्यंत वाढ दिसून येत होती. दररोज वातावरणात बदल होत असल्याने किमान तापमान हे कमी जास्त होताना दिसून येत आहे.
advertisement
4/5
भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके आहे. या जिल्ह्यातील तापमानात सर्वाधिक घट झाल्याचे दिसून येत आहे. गोंदिया भंडारा या दोन जिल्ह्यातील थंडीचा जोर कायम आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत राहणे आवश्यक आहे. काही दिवस आधी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली होती. आता त्यात बदल होताना दिसून येत आहे.
advertisement
5/5
काही जिल्ह्यांत ती घट कायम आहे. पण काही जिल्ह्यांत किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झालाय. शेतकऱ्यांच्या नुकसानीत पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात दाट धुक्यासह ढगाळ वातावरण! भंडारा, गोंदियात हुडहुडी, कितीवर घसरला पारा?