Nashik RTO: नाशिक पोलिसांची कडक भूमिका, आरटीओ ॲक्टिव्ह मोडवर; नियम तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नाशिककरांच्या दृष्टीने नाशिक वाहतूक विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाहतुकीचे नियम न पाळणार्या बस चालकांवर आता कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बस चालवताना सर्व नियम धाब्यावर बसवणाऱ्या ड्रायव्हरवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. या कारवाईसाठी सुरूवात झाली असून कारवाईच्या नियमांचे पालन न करणाऱ्या ड्रायव्हरवर कारवाई सुरू आहे.
advertisement
1/6

नाशिक आरटीओने नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बस चालकांवर कारवाई करण्यासाठी सुरूवात केली आहे. बस चालकांकडून नियमांचे पालन केले जात नव्हते, यासाठीच आता नाशिक आरटीओने बस चालकांवर कारवाई करण्यासाठी सुरूवात केली आहे. यामुळे शहरातल्या बस चालकांवर कारवाई केली जात आहे.
advertisement
2/6
नाशिक जिल्ह्यामध्ये 'सिटी लिंक' नावाची बस कंपनी बस सुविधा पुरवतेय. आरटीओने नियमांचे पालन न करणाऱ्या बस चालकांवर कारवाई करण्यासाठी सुरूवात केलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बस चालकांच्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी नाशिक वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले.
advertisement
3/6
झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे, सिग्नल तोडणे, स्पीड लिमिट आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका यासर्व गोष्टींमुळे आता नाशिक आरटीओकडून कारवाई केली जात आहे. 'सर्वांना समान नियम' या तत्त्वाच्या आधारे नाशिक आरटीओकडून कारवाई केली जात आहे. अनेकदा 'सिटी लिंक'च्या ड्रायव्हर्सकडून सामान्य नागरिकांच्या जीवाला हानी पोहोचली आहे.
advertisement
4/6
गेल्या काही वर्षांमध्ये बसच्या धडकेमध्ये 7 नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे नाशिक आरटीओने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शिवाय, इतरत्र गुन्ह्यांचीही नोंद पोलिसांनी केलेली आहे. त्याप्रमाणेच कारवाई केली जात आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच बस चालकांनाही नियम आता नाशिक आरटीओने सुरू केले आहे.
advertisement
5/6
वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या ड्रायव्हर्सला आरटीओकडून नियमांची आठवण करून दिली जात आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे प्रवाशांच्याही सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या दृष्टीनेच नाशिक आरटीओने बस चालकांवर कारवाई करण्यासाठी सुरूवात केलेली आहे.
advertisement
6/6
ज्या ड्रायव्हर्सवर आरटीओकडून कारवाई केली गेली आहे, त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये आता बदल होताना दिसत आहे. सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नियमभंग करणाऱ्या ड्रायव्हर्सचे फोटो थेट पोलीस आयुक्तालयांच्या नियंत्रण कक्षात पोहोचत आहे. त्यामुळे आरटीओकडून बस चालकांवर आता कसून कारवाई केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik RTO: नाशिक पोलिसांची कडक भूमिका, आरटीओ ॲक्टिव्ह मोडवर; नियम तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले