Dombivli Food: 10 हून अधिक प्रकारचे सलाड आणि सँडविच, हेल्दी फूड लव्हरसाठी डोंबिवलीत बेस्ट ठिकाण
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Dombivli Food: कोरोना महामारीनंतर प्रत्येकजण आपल्या फिटनेसबाबत जागृक झाला आहे. अनेकजण जीम करण्यासोबतच डाएट फूड देखील घेत आहेत. या सगळ्यांसाठी डोंबिवलीमध्ये एक बेस्ट लोकेशन आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर 'न्यूट्रीस्ट्रीट किचन' आहे.
advertisement
1/7

डोंबिवली असलेल्या या फूड कॉर्नरचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे न्यूट्रिशियन फूड मिळते. ज्यामध्ये दहाहून अधिक प्रकारचे सलाड, स्प्राउट डिशेस, सँडविच यांचा समावेश आहे. जिम करणारे अनेक जण हमखास इथं रोज येतात.
advertisement
2/7

आर्या बेंद्रे या मराठी महिलेने लॉकडाऊनच्या नंतर या व्यवसायाला सुरुवात केली. बाहेरचं खाणं अनेकांना आवडतं पण त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आर्या यांनी नवीन युक्ती शोधली आणि स्वतःचे न्यूट्री स्ट्रीट किचन सुरू केले.
advertisement
3/7
या न्यूट्रीस्ट्रीट किचन मधून त्या बाहेर मिळणारे सगळे पदार्थ पौष्टिक पद्धतीने बनवून विकू लागल्या. ऑटोमोबाईल्स या क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्या आणि त्याच क्षेत्रात पूर्वी काम करणाऱ्या आर्या यांना कायमच नवीन काहीतरी करायचे होतं आणि म्हणूनच त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली.
advertisement
4/7
जिमला जाणाऱ्यांसाठी इथं एक विशेष डिश आहे. ते म्हणजे मटकी भेळ आणि स्प्राउट भेळ. या भेळमध्ये सगळ्या प्रकारचे कडधान्य असतात. त्यामुळे ही चटपटीत आणि पौष्टिक भेळ खाण्यासाठी इथं आवर्जून लोकं घेतात.
advertisement
5/7
सँडविचमध्ये सुद्धा दहाहून अधिक प्रकार मिळतील. ज्यामध्ये व्हेज ग्रील सँडविच, आलू सँडविच, चीज ग्रील सँडविच, व्हेज पनीर ग्रील सँडविच, व्हेज पनीर चीज ग्रील सँडविच, यांचा समावेश होतो. या सँडविचमध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या भाज्या अगदी फ्रेश वापरल्या जातात. इथे मिळणारे पालक रॅप आणि बीट रूट रॅप तर कमाल लागतं.
advertisement
6/7
या न्यूट्रीस्ट्रीट किचनमध्ये तुम्हाला सफरचंद, अननस, पपई आणि यासोबतच डिटॉक्स, इम्युनिटी, स्ट्रेस बस्टर असे ज्युसेस मिळतात. यांच्या इथे मिळणारा डिटॉक्स ज्यूस खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये तुम्हाला सफरचंद, पालक, कोथिंबीर, काकडी आणि लिंबू अशा सगळ्यांचे मिश्रण मिळेल.
advertisement
7/7
'मला कायमच काहीतरी वेगळा व्यवसाय करायचा होता. अशातच लॉकडाऊननंतर अनेक जण स्वतःच्या फिटनेसची काळजी घेताना दिसून यायला लागले. म्हणूनच मी पौष्टिक आहार मिळणारं न्यूट्रीस्ट्रीट किचन सुरू केलं' असं व्यावसायिक आर्या बेंद्रे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Dombivli Food: 10 हून अधिक प्रकारचे सलाड आणि सँडविच, हेल्दी फूड लव्हरसाठी डोंबिवलीत बेस्ट ठिकाण