Pandharpur : श्री राम प्राणप्रतिष्ठेनिमित्त सजलं पंढरपूर; फुलांची सुंदर सजावट पाहून मोहित झाले लोक
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
मुंबई, प्रतिनिधी/विरेंद्रसिंह उत्पात : अयोध्येच्या मंदिरात आज श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. या निमित्ताने पंढरपूरचा सावळाराम अर्थात विठ्ठलाचे मंदिर हे आकर्षक झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले. संपूर्ण मंदिर हे भगवामय आणि राममय झालेले पाहायला मिळत आहे. ही सुंदर सजावट पाहून भाविक मंत्रमुग्ध आणि थक्क झाले.
advertisement
1/5

आज प्रभु श्रीराम यांची मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि व्हीव्हीआयपी लोकांच्या उपस्थितीत अयोध्येमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.
advertisement
2/5
प्राण-प्रतिष्ठा ऐतिहासिक सोहळा आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटाला सुरु होणार आहे. संपूर्ण अयोध्या नगरी कित्येक हजार क्विंटल फुलांनी सजवली गेली आहे.
advertisement
3/5
तसेच भव्य राम मंदिर 3 हजार किलो फुलांनी सजवले गेले आहे. श्री रामाच्या स्वागतासाठी केवळ अयोध्येमध्येच नाही तरी देश-विदेशातही मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु आहे.
advertisement
4/5
अनेक ठिकाणी लोक एकत्र येऊन तयारी करत आहेत. अनेक ठिकाणी राम चरित मानसचे पठण होत आहे. देशातील शेकडो मंदिरं सजवली गेली आहेत. पंढरपूरचे विठ्ठलाचे मंदिरही अगदी सुंदर सजवले गेले आहे.
advertisement
5/5
सोमवारी अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सव होणार आहे. सांस्कृतिक नृत्य आणि वादन होणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रदेशासोबत देशभरातील परंपरा आणि कला इथे सादर होणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Pandharpur : श्री राम प्राणप्रतिष्ठेनिमित्त सजलं पंढरपूर; फुलांची सुंदर सजावट पाहून मोहित झाले लोक