TRENDING:

Reel Star Komal Kale: 'चेहरा भोळा अन् भानगडी सोळा' रीलस्टार कोमलचे बॉयफ्रेंडसोबत 'झटपट पटापट' कारनामे, नगरमध्ये खळबळ PHOTOS

Last Updated:
reel star komal kale : लाईक आणि कंमेंटच्या या दुनियेत कायम फेमस राहण्यासाठी अहिल्यानगरमधील एका जोडीने तर हद्द पार केली. अखेर रीलस्टार जोडप्याला आता जेलची हवा खावी लागली आहे.
advertisement
1/11
'चेहरा भोळा अन् भानगडी सोळा' रीलस्टार कोमलचे बॉयफ्रेंडसोबत 'झटपट पटापट' कारनामे
सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण आणि तरुणी इंस्टाग्राम कधी काय करतील याचा नेम नाही. एक एक लाईक मिळवण्यासाठी लोक वाकडं तिकडं नाचूक, तर कुठे अंग प्रदर्शन करून लाईकच्या मागे वेडी झाली आहे. लाईक आणि कमेंटच्या या दुनियेत कायम फेमस राहण्यासाठी अहिल्यानगरमधील एका जोडीने तर हद्द पार केली. अखेर रीलस्टार जोडप्याला आता जेलची हवा खावी लागली आहे.
advertisement
2/11
इंस्टाग्राममध्ये एक दुसरी रील पुढे गेली की एखादी पोरगी कुठल्या तरी गाण्यावर किंवा सिनेमाच्या सीनवर हटके स्टाईलमध्ये डायलॉग मारताना दिसतात, त्यांची ही अदा फॉलोअर्स लोकांना भावते, पण, फॉलोअर्स लोकांना खूश करण्यासाठी अहिल्यानगरमधील एक मराठी मुलगी कोमल काळेचे वेगळेच कारनामे समोर आले आहे.
advertisement
3/11
सोशल मीडियावर रील्स करून फॉलोअर्सची मनं जिंकणारी ‘रीलस्टार’ कोमल काळे प्रत्यक्षात बसने प्रवास करणाऱ्या महिलांची दागिने-पर्स चोरणारी चोरटी निघाली आहे. एवढंच नाहीतर तिचा बॉयफ्रेंड सुद्धा तिचा क्राईम पार्टनर निघाला आहे.
advertisement
4/11
या बंटी-बबली जोडीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोमल आणि तिचा प्रियकर सुजीत चौधरी याला जेरबंद करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
advertisement
5/11
शेवगाव शहरातील भीमसेन नगर मधील कोमल काळे आणि पाथर्डी तालुक्यातील निपाणी जवळा येथील तिचा प्रियकर सुजीत राजेंद्र चौधर ही दोघे मिळून बसमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांच्या पर्स आणि दागिन्यांवर डल्ला मारत होते.
advertisement
6/11
चोरी केलेल्या वस्तू विकून त्यामध्ये कोमलही महागड्या वस्तू खरेदी करत होती. महागडे कपडे, मोबाईल, रिल बनवण्यासाठी कॅमेरे अशा अनेक वस्तूंची तिने चोरीच्या पैशातून खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
advertisement
7/11
गमंत म्हणजे, इंस्टाग्रामवर कोमलचे तब्बल ५० हजार फॉलोअर्स असून, ‘ग्लॅमरस रीलस्टार’ म्हणून तिची ओळख होती. या प्रकरणाचा उगम पाथर्डीतील अलका मुकुंद पालवे यांचे दागिने बस प्रवासात चोरीला गेल्यानंतर झाला.
advertisement
8/11
जिल्ह्यात अशा अनेक प्रकारच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल झाल्या. त्यामुळे बस प्रवासामध्ये कुणी तरी चोरी करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. नेहमीच्या चोरांनी हे कृत्य केलं नसल्याचं समोर आलं.
advertisement
9/11
मग त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करून स्वतंत्र पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषणात कोमल काळे हिचं नाव ठळकपणे पुढे आलं आणि अखेर दोघांना अटक करण्यात आली.
advertisement
10/11
पोलिसांनी या बंटी बबली रिलस्टार जोडीकडून 9,35,230 किंमतीचा ऐवज जप्त केलाय. यात 6.5 तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांहून अधिक किंमतीचा आयफोन 17 प्रो मॅक्स आणि इतर रोख रक्कम आणि मोबाईलचा समावेश आहे.
advertisement
11/11
पोलिसांनी कोमल आणि तिचा बॉयफ्रेंडवर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या दोघांनी अजून किती ठिकाणी चोरी केल्या आहेत याचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Reel Star Komal Kale: 'चेहरा भोळा अन् भानगडी सोळा' रीलस्टार कोमलचे बॉयफ्रेंडसोबत 'झटपट पटापट' कारनामे, नगरमध्ये खळबळ PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल