TRENDING:

Sangli Bailgada Race : हे तर काहीच नाय...पुढच्यावर्षी बघा थेट BMW!

Last Updated:
Sangli Shrinath Kesari Bailgada Sharyat Final: सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल अखेर रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला आणि या शर्यतीचा थरार अनुभवणाऱ्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
advertisement
1/6
'आता फॉर्च्युनर जिंकली, पुढच्या वर्षी 'ही' गाडी'; चंद्रहार पाटलांची मोठी घोषणा
सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल अखेर रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला आणि या शर्यतीचा थरार अनुभवणाऱ्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
advertisement
2/6
बैलगाडी शर्यतीच्या स्पर्धेला अलिशान गाड्या आणि आकर्षक बक्षीसे ठेवल्यामुळे ती राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. अंतिम फेरीत अनेक दिग्गज बैलजोड्यांना मागे टाकत 'हेलिकॉप्टर बैज्या' आणि 'ब्रेक फेल' या बैलजोडीने मैदान मारले आणि मानाची 'फॉर्च्युनर' गाडी (Fortuner Car) जिंकण्याचा मान पटकावला.
advertisement
3/6
या विजयी जोडीतील 'हेलिकॉप्टर बैज्या' हा कोल्हापूरच्या शिरोळ येथील बाळू दादा हजारे यांचा आहे. तर 'ब्रेक फेल' हा सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा आहे. या बैलजोडीने विजेतेपद पटकावताच उपस्थितांनी मोठा जल्लोष केला आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
advertisement
4/6
या स्पर्धेसाठी केवळ सांगलीतूनच नाही, तर राज्यभरातून बैलगाडी मालक आणि शर्यतीचा शौक असणारे दर्दी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अशा मोठ्या स्पर्धेमुळे शौकिनांना पुन्हा एकदा पारंपरिक थरार अनुभवता आला.
advertisement
5/6
श्रीनाथ केसरी शर्यतीचे मैदान संपताच आयोजक चंद्रहार पाटील यांनी एक धक्कादायक आणि मोठी घोषणा केली.
advertisement
6/6
ज्यामुळे उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला. त्यांनी जाहीर केले की,"पुढच्या वर्षी बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम बक्षीस थेट 'BMW' कार असेल." या घोषणेमुळे राज्यातील बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात आणखी एका विक्रमी बक्षीसाची नोंद झाली असून, पुढील स्पर्धेची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sangli Bailgada Race : हे तर काहीच नाय...पुढच्यावर्षी बघा थेट BMW!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल