TRENDING:

Sangli Crime : सांगलीत 'हिट अँड रन'चा थरार, आलिशान कारने 8 ते 10 वाहनांना उडवलं; हजारोंचा जमाव जमला अन्...

Last Updated:
Sangli Hit And Run Case : सांगली-खोतवाडी रस्त्यावर शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास हिट ॲण्ड रनची थरारक घटना घडली. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.
advertisement
1/7
सांगलीत हिट अँड रन, आलिशान कारने 8 ते 10 वाहनांना उडवलं; हजारोंचा जमाव जमला अन्
सांगली खोतवाडी रस्त्यावर रात्री साडेआठच्या सुमारास हिट अँड रनची थरारक घटना घडली आहे. वाहन चालकाने रस्त्यावरील आठ ते दहा दुचाकींना उडवलं आहे. माधवनगर आणि बुधगावच्या नागरिकांसह वाहनधारकांनी गाडीचा पाठलाग केला. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 
advertisement
2/7
सांगली ग्रामीण पोलिसांनी रात्री तात्काळ धाव घेऊन पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. नितेश पाटील असे चालकाचे नाव असून तो आटपाडी तालुक्यातील आहे. दुचाकीसह चारचाकीचे ही मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
3/7
आरोपी पाटील हा रात्री चारचाकी घेऊन माधवनगर ते बुधगाव या रस्त्याने रात्री निघाला होता. वसंतदादा कारखान्यासमोर एका दुचाकीलाधडक दिली. बुधगाव येथे एका मोटारसायकलस्वाराला त्याने फरफटत नेलं.
advertisement
4/7
आरोपी नितेश पाटील त्यानंतर रस्त्यावर आडवा देणाऱ्या वाहनांना जोराची धडक दिली आणि एका कमानीला जाऊन धडकला, असं प्रत्येक प्रत्यक्षदर्शनी लोकांनी सांगितलं आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.
advertisement
5/7
खोतवाडी गावाच्या स्वागत कमानीला गाडी धडकवल्याने ती थेट शेतात जाऊन आदळली. माधवनगर आणि बुधगावच्या गावकऱ्यांनी कारचा पाठलाग करून चालकाला पकडलं. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
advertisement
6/7
पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हजार ते दीड हजाराचा जमाव जमा झाला होता. संतप्त जमावाने त्याच्या गाडीची तोडफोड केली.
advertisement
7/7
पोलिसांनी जमावाला बाजूला करीत चालकाला ताब्यात घेतलं. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर जखमींपैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sangli Crime : सांगलीत 'हिट अँड रन'चा थरार, आलिशान कारने 8 ते 10 वाहनांना उडवलं; हजारोंचा जमाव जमला अन्...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल