सलग 4 दिवस पावसामुळे नवं संकट, घाबरलेत सांगलीकर; पूर नाही तर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
सांगलीत सलग 4 दिवस पाऊस पडला. यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला पण सततच्या पावसानंतर नवं संकट उभं राहिलं आहे. ज्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. (असिफ मुरसल/प्रतिनिधी)
advertisement
1/5

सांगलीत गेले सलग 4 दिवस पाऊस पडतो आहे. पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला आहे पण नवं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे सांगलीकर घाबरले आहेत. सतत 4 दिवस पावसामुळे सांगलीतील हरिपूर संगम ते औदुंबरचा डोह दरम्यान कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आहे.
advertisement
2/5
डीग्रज बंधारा ते औदुंबर या ठिकाणी नदीपात्रात बारमाही पाणी असतं. यात मासे, बेडुक मुबलक प्रमाणात असता. पक्षीही दिसून येतात. त्यामुळे मगरींचंही इथं वास्तव्य आहे. महापुरानंतर या पट्ट्यात मगरीची संख्या वाढली आहे. पूर्वी मोजक्या ठिकाणी दिसणारी मगर नदीकाठी सर्रास दिसू लागली आहे.
advertisement
3/5
क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रीस प्रकारातील गोड्या पाण्यात आढळणाऱ्या मगरीचा जानेवारी ते मे दरम्यान विणीचा हंगाम असतो. ओलसर मातीत मगर घरटं करून त्यात 40 ते 60 अंडी देते. त्यावर पालापाचोळा घालून झाकून ठेवते. जवळपास 90 दिवसानंतर पिल्लं अंड्यातून बाहेर येतात. ती साधारणपणे जून महिन्यात नदीकाठी दिसून येतात.
advertisement
4/5
पावसामुळे कृष्णा नदीपत्रात अचानक पाणी पातळी वाढली आहे. नदीचं पाणी वाढल्याने घरटी उद्धस्त होतात मग मगर पिल्लांसह लगतच्या शेतात सरकते.
advertisement
5/5
ही पिल्लं आजूबाजूच्या मळी भागात सरकल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. शेतीच्या कामासाठी नदीकाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मगरीचे नेहमी दर्शन होतं. त्यामुळे मळीभागातील शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सांगली/
सलग 4 दिवस पावसामुळे नवं संकट, घाबरलेत सांगलीकर; पूर नाही तर...