भारतातला सर्वात उंच, आकर्षक धबधबा साताऱ्यात! ओसंडून वाहू लागला
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
मुसळधार नसला तरी आता पाऊस दिवसभरातून एकदातरी हजेरी लावतोच. पावसामुळे झाडं, रान, मळे अगदी छान धुवून निघाले आहेत, त्यामुळे सगळीकडे मनमोहक अशी हिरवळ दिसून येते. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी हा काळ उत्तम आहे. विशेष म्हणजे आता नदी-नाले झुळझुळ वाहू लागले असून त्यांच्या आजूबाजूला हिरवळ निर्माण झालीये, शिवाय धबधबेही जोमाने कोसळू लागले आहेत. (शुभम बोडके, प्रतिनिधी / सातारा)
advertisement
1/5

सातारा शहराच्या पश्चिमेस सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भारतातला सर्वात उंच धबधबा वेगानं वाहू लागला आहे. भांबवली इथला हा वजराई धबधबा. ज्याचं सौंदर्य पाहून सध्या पर्यटकांचं मन अक्षरश: भारावून जातंय.
advertisement
2/5
या धबधब्याची उंची आहे तब्बल 1840 फूट म्हणजेच जवळपास 560 मीटर. 3 टप्प्यांमध्ये तो वाहतो. सर्वात उंचीवरून 3 टप्प्यांत कोसळणारा धबधबा अशी त्याची जगभरात ओळख आहे.
advertisement
3/5
या भल्यामोठ्या धबधब्याचं पांढरंशुभ्र पाणी वाहताना पाहणं हे पर्यटकांसाठी अगदी डोळ्यांचे पारणं फेडणारं दृश्य असतं. सातारा शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर भांबवली गावाजवळ हा भांबवली वजराई धबधबा आहे.
advertisement
4/5
विशेष म्हणजे धबधब्याच्या सभोवतालचा परिसर प्रचंड हिरवागार असल्यानं धबधब्याचं वाहतं पाणी अधिकच पांढरंशुभ्र दिसतं. घनदाट जंगल, पालापाचोळ्याची पायवाट आणि हिरव्यागार डोंगरांमधून जाताना जसजसा धबधबा जवळ येतो तसतसा त्याच्या पाण्याचा कोसळण्याचा आवाज कानावर पडतो आणि मन अगदी मंत्रमुग्ध होतं.
advertisement
5/5
खरंतर पूर्ण सातारा जिल्हा <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/monsoon-picnic-spots-near-mumbai-and-thane-enjoy-weekends-away-from-the-hustle-of-the-city-mhpp-1201438.html">नैसर्गिक संपत्ती</a>च्या दृष्टीने अतिशय <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/travel/famous-10-tourist-places-in-chhatrapati-chhatrapati-sambhaji-nagar-to-visit-in-monsoon-mats-l18w-1197785.html">संपन्न</a> आहे. इथं अनेक लहान-मोठे धबधबे आहेत. त्यामुळे राज्यभरातून हजारो पर्यटक याठिकाणी येतात. पावसाळ्यात तर धबधबे भरून वाहायला लागले की <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/planning-a-rainy-picnic-big-changes-in-the-ways-to-go-to-goa-mhsz-1201869.html">पर्यटकांची मोठी गर्दी</a> होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
भारतातला सर्वात उंच, आकर्षक धबधबा साताऱ्यात! ओसंडून वाहू लागला