TRENDING:

आमदाराचं स्टिकर लावलेली 3 कोटींची Defender कुणाची? तो कंत्राटदार कोण? भाजपकडून संजय गायकवाडांवर थेट वार, PHOTOS

Last Updated:
गंंमत म्हणजे, या डिफेंडवर विधानसभा आमदाराचं स्टिकर आहे. ही गाडी एका कंत्राटदाराची असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. यावर गायकवाड यांनी गंमतीशीर उत्तर दिलं आहे. (राहुल खंदारे, प्रतिनिधी)
advertisement
1/7
3 कोटींची Defender कुणाची? तो कंत्राटदार कोण? भाजपकडून गायकवाडांवर थेट वार
शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड या ना त्या प्रकरणामुळे कायम चर्चेत असतात. आमदार निवासमध्ये मारहाण असो किंवा वादग्रस्त विधान असो. अशा अनेक प्रकरणामुळे गायकवाड हे कायम चर्चेत असतात. पण अशातच आता संजय गायकवाड आता ३ कोटींच्या डिफेंडर (land rover defender) एसयूव्हीमुळे वादात अडकले आहे. गंमत म्हणजे, या डिफेंडवर विधानसभा आमदाराचं स्टिकर आहे. ही गाडी एका कंत्राटदाराची असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. यावर गायकवाड यांनी गंमतीशीर उत्तर दिलं आहे.
advertisement
2/7
आज एक डिफेंडर बुलडाण्यात आली आहे. ती डिफेंडर कुणाची आहे. ही डिफेंडर एका कंत्राटदाराच्या नावावर आली आहे. ती डिफेंडर कुणाची आहे. कोणत्या कंत्राटामध्ये कमिशन मिळालं आहे. याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असा आरोप भाजपचे भाजप नेते विजयराज शिंदे यांनी केली आहे.
advertisement
3/7
विधानसभेची निवडणूक झाल्या झाल्या माझ्यावर ५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. यामध्ये मी दीड कोटी रुपयांची डिफेंडर गाडी घेतली. एक कोटी दत्ता पाटील यांनी घेतले. एक कोटी दिपक वारेंनी घेतले. १ कोटी चंद्रकांत बर्द्रेंनी घेतले. एक कोटी प्रभाकर वारेंनी घेतले. मी यांच्याबद्दल पक्षाकडे तक्रार केली, अशा सगळ्यांनी बातम्या दिल्या. मित्र पक्षाने मदत केली नाही, मतदार वेश्या आहे, असं वक्तव्य करणारे आमदार हे संजय गायकवाड आहे. त्यांनी आरोप केला होती की, मी दीड कोटींची डिफेंडर घेतली होती, ती आजपर्यंत मला सापडली नाही की ती कुठे आहे, असा टोलाही विजय शिंदे यांनी गायकवाड यांचं नाव न घेता लगावला.
advertisement
4/7
मला विजय शिंदेंना उत्तर देण्याची मला गरज नाही. पण ती गाडी माझ्या नातेवाईकांची आहे. निलेश ढवळेची आहे. तो कंत्राटदार असला तरी माझा आधी नातेवाईक आहे. आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे.,असा खुलासा संजय गायकवाड यांनी केला.
advertisement
5/7
या कारवर दीड कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. त्याच्याकडे आधी लिजेंडर होती ती विकली. त्याचं डाऊनपेमेंट घेऊन ३ कोटींची डिफेंडर कार घेतली आहे, १०० टक्के कर्जावर कार घेतली आहे, यावर काय चर्चा करायची, असंही संजय गायकवाड म्हणाले.
advertisement
6/7
पण, डिफेंडर गाडीवर आमदाराचं स्टिकर लावलं आहे असं पत्रकारांनी विचारलं असता, गायकवाड म्हणाले की, आमदाराचं स्टिकर माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी कारवर लावलं आहे. मलाही डिफेंडर गाडीचं आकर्षण होतं. मीही ती मागवून घेतली. मला काही दिवस वापरू दे. म्हणून त्यावर आमदाराचं स्टिकर लावलं.
advertisement
7/7
विशेष म्हणजे, संजय गायकवाड हे डिफेंडर घेऊन सगळ्या ठिकाणी फिरत आहे. या गाडीवर विधानसभा आमदार असल्याचं स्टिकर लावलेलं आहे. पण, संजय गायकवाड ही गाडी आपली नसल्याचा दावा करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आमदाराचं स्टिकर लावलेली 3 कोटींची Defender कुणाची? तो कंत्राटदार कोण? भाजपकडून संजय गायकवाडांवर थेट वार, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल