TRENDING:

प्रशांत महासागरात मोठ्या हालचाली, अल निनोमुळे यंदा पाऊस उशीरा? स्कायमेटचा अंदाज काय सांगतो

Last Updated:
Skymet च्या अहवालानुसार अल निनोमुळे २०२६ चा मान्सून लहरी आणि कमी असण्याची शक्यता, शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन व कमी पाण्याच्या पिकांची निवड करावी.
advertisement
1/7
प्रशांत महासागरात मोठ्या हालचाली, अल निनोमुळे यंदा पाऊस उशीरा?
मुंबई: पिण्याचं पाणी, शेती या दोन मुख्य गोष्टी मान्सूनवर अवलंबून असतात. पाऊस चांगला झाला भूजल पातळी चांगली राहिली तर त्याचा फायदा होत असतो. या वेळी मात्र थोडी चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. प्रशांत महासागरात होणाऱ्या हालचालींमुळे मान्सूनचं गणित काहीसं बिघडणार आहे. त्याचा मोठा फटका बसणार आहे. स्कायमेट या खासगी संस्थेनं मान्सूनबाबत पहिला अहवाल जारी केला आहे.
advertisement
2/7
२०२६ चा मान्सून मात्र काहीसा लहरी ठरण्याची चिन्हे आहेत. खासगी हवामान संस्था Skymet या खासगी संस्थेनं मान्सूनचा जो प्राथमिक अंदाज दिला आहे, तो पाहता यंदा आभाळात ढगांचा गडगडाट कमी आणि चिंतेचे सावट जास्त राहण्याची शक्यता आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अल निनोचं वाढतं संकट.
advertisement
3/7
प्रशांत महासागराच्या पोटातील पाण्याचे तापमान जेव्हा वाढते, तेव्हा त्याला हवामान शास्त्रात अल निनो म्हणतात. हे तापमान वाढलं की त्याचा थेट फटका भारतीय मान्सूनला बसतो. स्कायमेटचे तज्ज्ञ महेश सांगतात की, सध्या प्रशांत महासागर तापू लागला आहे. जेव्हा जेव्हा अल निनो तयार होण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा तो भारतीय पावसाचा जोर कमी करतो.
advertisement
4/7
२०१४ आणि २०१८ साली आपण याचा अनुभव घेतला आहे, ज्यावेळी अनेक भागांत दुष्काळाने पीक करपून गेलं होतं. याशिवाय हिटवेव देखील लवकर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीपासून काळजी घ्यावी.
advertisement
5/7
यंदा केवळ पाऊस कमी पडेल असं नाही, तर तो 'वेळेवर' येईल की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा प्रवास संथ होतो. परिणामी, केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल होऊ शकतो. जर सुरुवातीचा पाऊस लांबला, तर शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबतील आणि ज्यांनी धूळवाफ पेरणी केली आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं.
advertisement
6/7
आपल्या मान्सूनला 'इंडियन ओशन डायपोल नावाचा एक मोठा आधार असतो. जर हा घटक सकारात्मक असेल, तर तो अल निनोचा जोर कमी करतो. मात्र, यंदा हा आधारही काहीसा कमकुवत दिसतोय. स्कायमेटच्या मते, सध्या आयओडी सकारात्मक असला तरी तो अल निनोच्या ताकदीसमोर फार काळ टिकणार नाही. त्यामुळे पावसाला मिळणारं नैसर्गिक बळ यंदा कमी पडताना दिसत आहे.
advertisement
7/7
पाऊस कमी आणि उशिरा असेल हे गृहीत धरून आपण आपली तयारी बदलायला हवी. विहिरी आणि कूपनलिकांमधील पाण्याचे नियोजन आतापासूनच करा. बाजरी, मूग, उडीद किंवा अशा पिकांची निवड करा ज्यांना पाण्याची गरज कमी असते. हा अंतिम अहवाल नाही, या अहवालातून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
प्रशांत महासागरात मोठ्या हालचाली, अल निनोमुळे यंदा पाऊस उशीरा? स्कायमेटचा अंदाज काय सांगतो
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल