कपाळी चंदनाचा टिळा, अंगावर सोन्याचा लखलखाट, तिकीटासाठी अजितदादांकडे आलेल्या अबोली अक्का आहे तरी कोण?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सोलापूर महानगरपालिकेसाठी आधी भाजप त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तृतीयपंथी असणाऱ्या अबोली अक्काकडे उमेदवारी मागितली आहे.
advertisement
1/7

महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी मिळावी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती देण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे सोलापूरच्या राजकारणात एका व्यक्तीची चर्चा रंगली असून सगळ्यांचं लक्ष वेधले आहे.
advertisement
2/7
सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. मात्र या मुलाखतीत सर्वात जास्त चर्चा झाली ती 'अबोली अक्कांची'
advertisement
3/7
अबोली अक्कांच्य एन्ट्री जोरदार झाली आहे. अंगभर सोन्याचे दागिने, कपाळावर चंदनाचा टिळा, साडी नेसलेल्या अबोली अक्काने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
advertisement
4/7
सोलापूर महानगरपालिकेसाठी आधी भाजप त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तृतीयपंथी असणाऱ्या अबोली अक्काकडे उमेदवारी मागितली आहे.
advertisement
5/7
रामचंद्र शेठ्ठप्पा मंजेली उर्फ अबोली अक्का यांनी भाजपकडून आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता अवघ्या आठवड्याभरात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून प्रभाग 9 मधून इच्छुक उमेदवार अर्ज दाखल केला.
advertisement
6/7
अबोली अक्का यांनी गळ्यात सोनं घालत सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आगमन झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अबोली आक्का यांनी महानगरपालिकेसाठी उमेदवारी मागितली असल्याचे सांगितले.
advertisement
7/7
वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अबोली अक्कांना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तिकिट मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
कपाळी चंदनाचा टिळा, अंगावर सोन्याचा लखलखाट, तिकीटासाठी अजितदादांकडे आलेल्या अबोली अक्का आहे तरी कोण?