95 वर्षीय आजींनी 14 व्यांदा केलं मतदान, घरातूनच बजावला हक्क, PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Amita B Shinde
Last Updated:
सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघातील पुसदच्या गंगादेवी शंकरलाल कान्हू या 95 वर्षीय आजींनी घऱातूनच मतदान केले.
advertisement
1/7

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान नुकतेच झाले. यामध्ये मतदारांनी चांगला प्रतिसाद दर्शवला.
advertisement
2/7
यवतमाळ जिल्ह्यातील 95 वर्षीय आजीने मतदानाचा हक्क बजावला. यावर्षी तिने घरबसल्या मतदान केले आहे. विशेष म्हणजे मतदान करण्याची आजी गंगादेवी शंकरलाल कान्हू यांची ही 14 वी वेळ आहे.
advertisement
3/7
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिला. तो हक्क मी बजावला असल्याचा आनंद आजीने व्यक्त केला.
advertisement
4/7
निवडणूक आयोगामार्फत 85 वर्षे वरील व्यक्तींना तसेच दिव्यांग व्यक्तींना घरीच मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिलाय.
advertisement
5/7
त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसदच्या गंगादेवी शंकरलाल कान्हू या 95 वर्षीय आजींनी घऱातूनच मतदान केले.
advertisement
6/7
गंगूबाई कान्हू यांनी पुसद शहरातील छत्रपती शिवाजी वार्ड येथील निवासस्थानी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसून आलं.
advertisement
7/7
पूर्वी मतदान केंद्रावर उचलून घेऊन जावं लागायचं. मला चालता येत नसल्यामुळे त्रास व्हायचा. आता मात्र घरी बसून मतदान केल्यामुळे एक वेगळा आनंद होतोय. विकासाचं राजकारण व्हायला हवं असं वाटतं. निवडून येणाऱ्या उमेदवाराने मतदारांची अपेक्षा पूर्ण करायला हवी, असं मनोगत आजीने व्यक्त केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
95 वर्षीय आजींनी 14 व्यांदा केलं मतदान, घरातूनच बजावला हक्क, PHOTOS