मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांचा भन्नाट उपक्रम; बागेतून घेत आहेत शिक्षणाचे धडे PHOTOS
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
विद्यार्थ्यांनी शाळेत पुस्तकाच्या पलिकडे शिकणं ही आवश्यक आहे. या छोट्या गावातल्या शाळेमध्ये एक खास उपक्रम राबवण्यात आला आहे.
advertisement
1/5

विद्यार्थ्यांनी शाळेत पुस्तकाच्या पलिकडे शिकणं ही आवश्यक आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात आणि खेळांच्या माध्यमातून शिकवणे आवश्यक आहे. <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> जिल्ह्यातल्या आष्टा या छोट्या गावातल्या शाळेमध्ये या पद्धतीचा एक खास उपक्रम राबवण्यात आला आहे.
advertisement
2/5
आष्टामधल्या झेडपी शाळेत परसबागेच्या निर्मितीचा उपक्रम शिक्षकांनी सुरु केलाय. त्यांनी परसबागेला शिक्षणाशी जोडलंय. परसबागेचा आकार किंवा परसबागेत उगवणाऱ्या भाज्यांची नावे, त्यांचे रंग, त्यांच्यातील जीवनसत्वे, प्रमाण भाज्यांच्या संख्या, वजन, अशा प्रकारच्या व्यवहारीक ज्ञानातून विद्यार्थी या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवतात.
advertisement
3/5
या शाळेतील परसबागेमध्ये सध्या बीट, मुळा, गाजर, पालक, मेथी, कोथिंबीर, लालमाठ, शेपू, टोमॅटो, वांगी, मिरची, पपई, हळद, वाल, काकडी, भोपळा या पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड करण्यात आलीय. परसबागेत फुलबाग, फळबाग आणि आयुर्वेदिक पार्क सुद्धा आहे.
advertisement
4/5
परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कल्पनाशक्ती मजबूत करणाऱ्या,या उपक्रमाला भविष्यवेधी उपक्रम असं नाव देण्यात आलं आहे..मुलांनी विविध रंगाच्या छटांमध्ये वावरल्याने मेंदू विकासाला चालना मिळते.
advertisement
5/5
या विचारातून कृती केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना परस बागेतून मिळणाऱ्या शिक्षणामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने भविष्यवेधी ठरतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांचा भन्नाट उपक्रम; बागेतून घेत आहेत शिक्षणाचे धडे PHOTOS