विदर्भात कोजागिरीला असतो भुलाबाई उत्सव, पाहा काय आहे खास?
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
विदर्भात कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाईचा उत्सव एक खास आकर्षण असतं. घरोघरी मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो.
advertisement
1/7

विदर्भातील कोजागिरी एक अकर्षकणाचा सण आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहात सहभागी होतात.
advertisement
2/7
भुलाबाई, भूलोबा म्हणजे शंकर पार्वती, गणपती असलेली मूर्ती स्थापित करून घरोघरी किंवा काही ठिकाणी सामूहिक पद्धतीने भुलाबाईची गाणी गाऊन जागरण केलं जातं.
advertisement
3/7
यात खिरापत हा विषय सर्वांचं आकर्षण असतं. खिरापत म्हणजे प्रत्येक घरी वेगवेगळ्या नाश्त्याच्या वस्तू खाण्यासाठी बनवल्या असतात. त्या उपस्थितांना ओळखायच्या असतात.
advertisement
4/7
नाश्त्याच्या वस्तू ओळखल्यानंतर त्या खिरापत म्हणून वाटली जाते. सर्वजण मोठ्या आनंदाने खिरापतचा लाभ घेतात.
advertisement
5/7
रात्री 12 वाजेपर्यंत सर्व मंडळी सामूहिक रित्या एकत्रित बसून किंवा घरगुती पद्धतीने दूध आटवतात. मसाला दूध किंवा बासुंदी बनवून रात्री देवाला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर सर्वजण ते सेवन करतात.
advertisement
6/7
विदर्भातील अनेक ठिकाणी विशेषतः ज्या घरी मुलगी आहे त्या घरी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कोजागिरी पर्यंत 5 दिवस रोज सायंकाळी भुलाबाईची गाणी गायली जात होती. मात्र ही परंपरा आता लुप्त झालेली दिसून येते.
advertisement
7/7
पूर्वी 5 दिवसांचा असणारा हा सण आता एकच दिवस कोजागिरीच्या दिवशी साजरा केला जातो.