TRENDING:

रस्त्यानं घेतला जीव, बैलगाडीतून निघाली अंत्ययात्रा, चंद्रावर पोहोचलेल्या भारताचं भयाण वास्तव

Last Updated:
भारत चंद्रावर पोहोचला असला तरी रस्त्यामुळं बळी जाण्याच्या दुर्दैवी घटना इथं घडत आहेत. वर्ध्यातील ही घटना मन सुन्न करणारी आहे.
advertisement
1/7
रस्त्यानं घेतला जीव, बैलगाडीतून अंत्ययात्रा, चंद्रावर पोहोचलेल्या भारताचं वास्तव
नुकतंच भारतीय चांद्रयान चंद्रावर पोहोचलं. मात्र, स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनीही भारतीयांना मुलभूत प्रश्नांसाठी झगडावं लागतंय. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडलीय. वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खैराटी पारधी वसतीतील एकाचा रस्त्यानंच बळी घेतलाय.
advertisement
2/7
अचानक प्रकृती बिघडल्यानंतर चिखलातून वाट काढत रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधीच एकाचा मृत्यू झाला. तर पुन्हा मृतदेह घरी नेण्यासाठी बैलबंडीचा वापर करावा लागला. त्यामुळे हा रस्ताच मृत्यूचा सापळा बनल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
advertisement
3/7
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत खैराटी पारधी बेडा आहे. या गावात 45 ते 50 घरे आहेत. 50 ते 60 वर्षांपासून हे लोक इथे वास्तव्यास आहेत. पारधी बेड्यातील एका व्यक्तीची प्रकृती बिघडली. त्याचे कुटुंबीय त्याला रात्री सेवाग्राम येथील रुग्णालयात घेऊन जायला निघाले.
advertisement
4/7
पारधी बेड्यापासून ग्रामीण रुग्णालय अंदाजे 10 ते 15 किलोमीटर आहे. तर सेवाग्राम रुग्णालय गाठण्यासाठी तब्बल 50 ते 55 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मात्र मुख्य रस्त्यांपर्यंतच्या कच्च्या रस्त्यामुळे रुग्णालयापर्यंत वेळेत पोहोचणं कठीण होतं. त्यामुळे बऱ्याचदा वाटेतच रुग्ण दगावतो.
advertisement
5/7
गावातील कच्च्या आणि पावसाळ्यामुळे अतिशय वाईट अवस्था असलेल्या रस्त्याने कशीबशी वाट काढत असताना रुग्णाचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर शवविच्छेदन झाल्यावर रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी चक्क बैल बंडी वापरावी लागली.
advertisement
6/7
या पारधी बेड्यातील नागरिकांची समस्या साधीसुधी नाही. गावात अजूनही नळाचं पाणी नाही. गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर स्मशानभूमी आहे. तिथं जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्यामुळे जंगल आणि शेतांतून वाट काढत खाटेवरून किंवा बैलबंडीतून अंत्ययात्रा काढावी लागते, असं गावकरी सांगतात.
advertisement
7/7
एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय आणि भारत चंद्रावर जाऊन पोहोचला. मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित गावे अजूनही देशात आहेत. खैराटी येथील गावकरी गेल्या कित्येक काळापासून प्रशासनाला निवेदन देत आहेत. मात्र याची दखल घेतली नाही, असे मृताचे भाऊ सुनील भोसले यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
रस्त्यानं घेतला जीव, बैलगाडीतून निघाली अंत्ययात्रा, चंद्रावर पोहोचलेल्या भारताचं भयाण वास्तव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल