घरात निर्माण होईल सकारात्मक ऊर्जा; फिश पॅाटमध्ये ठेवा 'हे' मासे
- Published by:News18 Marathi
 - local18
 
Last Updated:
फिश पॉटमध्ये काही खास मासे असणं अत्यंत शुभ मानलं जातं.
advertisement
1/6

अनेकजण घरात रंगबेरंगी माशांचा फिश टँक ठेवत असतात. आकर्षक दिसणारा हा फिश पॉट किंवा अॅक्वेरियम घरात असणं शुभ मानलं जातं. तसंच हा घराची शोभा वाढवतो. या फिश पॉटमध्ये काही खास मासे असणं अत्यंत शुभ मानलं जातं. या माशांमुळं घरात सुखशांती आणि भरभराट होते. समृद्धी नांदते आणि अगदी आयुष्यच बदलतं, असं मानलं जातं. त्यामुळे काही खास माशांना फिश पॉटमध्ये ठेवण्यासाठी प्रचंड मागणी असते. हे शुभ समजले जाणारे मासे कोणते आहेत? हेच तर आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
2/6
घरात विविध मासे ठेवणे शुभ मानले जाते. यात अरोवना किंवा ड्रॅगन फिश, सोनेरी मासा, ब्लॅक मूर, फुलपाखरू, कोईफ्लॉवर, हॉर्न फिश हे मासे खरेदी करणे सर्वात जास्त नागरिक पसंत करतात. तरीही सोनेरी माशांची मागणी सर्वात जास्त दिसून येते, असे फिश पॉट विक्री करणारे वर्धा येथील सारंग खाडे सांगतात.
advertisement
3/6
ड्रॅगन फिश म्हणजेच आरोवाना आणि सोनेरी माशांना घरात ठेवणे सकारात्मक ऊर्जा देणारं मानलं जातं. घरातील वातावरण सतत नैराश्याचे आणि गरीबीचे असेल किंवा सतत दु:खद घटनांना सामोरे जावे लागत असेल, घरात नकारात्मकता जाणवत असेल तर या विशेष प्रकारच्या माशांना आपल्या घरच्या फिश पॉटमध्ये ठेवणं सकारात्मक ऊर्जा आणू शकते, असे जाणकार सांगतात. त्यामुळे माशांच्या किमती महाग असूनही नागरिक प्राधान्याने खरेदी करताना दिसून येतात.
advertisement
4/6
गुलाबी रंगाची फ्लॉवर हॉर्न फिश दिसायला आकर्षक असते. फॅन्सी आणि सकारात्मक वास्तू साठीही चांगली मानली जाते. ती देखील महाग आहे. अडीच हजारांपासून ते 25 हजारांपर्यंत किमतीत तिला खरेदी केले जाते. विशेष म्हणजे ही फिश एका पॉटमध्ये एकटीच राहते.
advertisement
5/6
 तिच्याबरोबर दुसरी फिश ऍडजस्ट होत नाही आणि ती 15 वर्षपर्यंत जगू शकते असे जाणकारांकडून सांगितले जाते. ही फिश फॅमिलियर असते असेही विक्रेते सांगतात. या फ्लॉवर हॉर्न फिशला इशारा किंवा तिच्यासमोर हात हलवल्यास ती प्रतिसाद देते, असेही विक्रेते खाडे यांनी सांगितलं.
advertisement
6/6
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
घरात निर्माण होईल सकारात्मक ऊर्जा; फिश पॅाटमध्ये ठेवा 'हे' मासे