TRENDING:

Esha Dey : आधी चहा पाजला, मग नवऱ्यालाच लावलं कामाला; ईशा डेची लग्नानंतर पहिली पोस्ट, PHOTO

Last Updated:
Isha Dey : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे हिने गीतकार अभिषेक खणकरसोबत लग्न केले. लग्नानंतर ईशाने पहिली पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
1/11
 आधी चहा पाजला, मग नवऱ्यालाच लावलं कामाला; ईशा डेची लग्नानंतर पहिली पोस्ट, PHOTO
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री ईशा डे हिने नुकतंच गीतकार अभिषेक खणकरसोबत लग्नगाठ बांधली.
advertisement
2/11
लग्नानंतर आता ईशाने तिची पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली असून तिच्या या पोस्टने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
3/11
ईशाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात आणि संसारातील गोड क्षण पाहायला मिळत आहेत. लग्नानंतरच्या या खास फोटोंमध्ये ईशा पारंपरिक साडीत दिसत असून तिचा सोज्वळ आणि आनंदी दिसतेय.
advertisement
4/11
ईशा आणि अभिषेकने त्यांच्या घरातच एक साधं पण सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमधून त्यांच्या नात्यातील प्रेम, मैत्री आणि समजूतदारपणा दिसतोय.
advertisement
5/11
एका फोटोमध्ये दोघे निवांत बसून चहा पिताना दिसत आहेत. अभिषेक प्रेमाने ईशाकडे पाहतोय तर ईशा समाधानानं चहा पितेय. अभिषेकसोबत तिचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे.
advertisement
6/11
दुसऱ्या एका फोटोमध्ये ईशा अभिषेकला स्वतःच्या हाताने जेवण भरवताना दिसते. या फोटोमध्ये त्यांच्या नात्यातील आपुलकी आणि काळजी पाहायला मिळतेय.
advertisement
7/11
ईशा आणि अभिषेकच्या या फोटोशूटमध्ये त्यांच्या पाळीव श्वानाचीही खास एंट्री आहे. एका फोटोमध्ये दोघे आपल्या पाळीव श्वानासोबत मस्ती करताना दिसतात. 
advertisement
8/11
त्याचबरोबर एका फोटोमध्ये अभिषेक ईशाच्या मांडीवर डोकं ठेवून आराम करताना दिसतो. हा फोटो त्यांच्या नात्यातील जवळीक आणि प्रेम पाहायला मिळतंय.
advertisement
9/11
या फोटोशूटमधील शेवटचा फोटो मात्र थोडा हटके आणि मजेशीर आहे. या फोटोमध्ये ईशाने अभिषेकला कामाला लावल्याचं दिसत आहे. अभिषेक फ्रिजसमोर बसलेला असून ईशा त्याला फ्रिजमधून वस्तू काढून देण्यास सांगताना दिसते. या फोटोने चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे.
advertisement
10/11
"सोबती तव राहण्याची आस वेडी लागली", असं कॅप्शन देत ईशाने दोघांचे खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केलेत. ईशा आणि अभिषेकच्या नव्या आयुष्याची ही सुरुवात आनंददायी ठरली आहे. 
advertisement
11/11
ईशाच्या या पोस्टला सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी कमेंट करत या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या साध्या पण मनमोहक फोटोशूटचं विशेष कौतुक केलं जात आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Esha Dey : आधी चहा पाजला, मग नवऱ्यालाच लावलं कामाला; ईशा डेची लग्नानंतर पहिली पोस्ट, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल