युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा संपन्न, संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकत्र! पाहा समारंभातील Inside Photos
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yugendra Pawar Engagement : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडला आहे. मुंबईतील इंडियाबुल्स बिल्डिंगमध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे.
advertisement
1/4

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा पार पडला आहे.
advertisement
2/4
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. मुंबईतील प्रभादेवी येथील इंडियाबुल्स बिल्डिंग हा कार्यक्रम सोहळा पार पडला.
advertisement
3/4
अजित पवार आणि शरद पवार या दोघांनी देखील या साखरपुड्याला हजेरी लावली होती. पार्थ आणि जय पवार देखील यावेळी उपस्थित होते.
advertisement
4/4
काही दिवसापूर्वी अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळी देखील अख्खं पवार कुटुंब एकत्र दिसलं होतं. अशातच आता युगेंद्र यांच्या साखरपुड्याला देखील भरभराट आल्याचं दिसून आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा संपन्न, संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकत्र! पाहा समारंभातील Inside Photos