Astrology: भयंकर वाईट काळातही लढलो! या 5 राशींचे आता नशीब पालटणार; शनि-मंगळाची कृपा झाली
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 09, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेष (Aries) : आज मंगळवारचा दिवस नवी आशा आणि नवीन ऊर्जेचा आहे. तुमच्यात वेगळाच आत्मविश्वास दिसेल. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांचं फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कष्टांची कदर केली जाईल आणि उच्चाधिकाऱ्यांकडून कामाचं कौतुक होईल. नातेसंबंधात सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक स्थिती सुधारेल. स्वत:साठी थोडा वेळ काढा. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. सकारात्मक दृष्टिकोन फायद्याचा ठरेल. कृती आणि भावनांमध्ये सलोखा ठेवा. त्यामुळे सहजपणे उद्दिष्टं गाठू शकाल.Lucky Number: 12Lucky Color: Dark Green
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आज मंगळवारचा दिवस सकारात्मक ऊर्जा आणि नवीन शक्यतांचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वक्षमतेची प्रशंसा केली जाईल. त्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. आज आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. छोटी, महत्त्वाची गुंतवणूक करा. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या. काही वेगळ्या प्रकल्पावर काम करत असलात, तर त्यामध्ये पुढे जा. प्रिय व्यक्तींसह वेळ व्यतीत केल्यानं मानसिक शांतता मिळेल.Lucky Number: 11Lucky Color: Black
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आज मंगळवारी जीवनात महत्त्वपूर्ण बदलांचे संकेत आहेत. तुम्ही इतरांना तुमच्या विचारांनी आणि कल्पनांनी प्रभावित करू शकाल. मित्रांसोबत वेळ व्यतीत केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल आणि नवीन ऊर्जा मिळेल. हा आत्मचिंतनाचा काळ आहे. तुमच्या इच्छा आणि गरजांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत काम करणं फायद्याचं ठरेल. गटामध्ये दिलेल्या कल्पना नवीन मार्ग दाखवू शकतात; पण वैयक्तिक जीवनात काही आव्हानात्मक परिस्थिती उद्भवू शकतात. संयम आणि समजूतदारपणाने काम करा. तुमचा दिवस आनंदाने आणि नवीन संधींनी भरलेला असू शकतो. फक्त स्वत:वर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा.Lucky Number: 2Lucky Color: White
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आज मंगळवारचा दिवस नवीन शक्यता उलगडणारा दिवस असेल. तुमच्या भावनिक बाजूवर लक्ष देऊन कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ व्यतीत केल्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल. करिअरमध्ये काही सकारात्मक बदल दिसू शकतात. तुमच्या कामात पाठबळ मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन प्रोजेक्टवर काम करत असलात, तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आज आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या सावध राहा. सध्या तरी गुंतवणुकीचे निर्णय घेण्यात घाई करू नका. सगळ्या बाजू समजून घेतल्यावरच निर्णय घ्या. तुमची संवेदनशीलता आणि केअरिंग स्वभाव सभोवतालच्या व्यक्तींना आवडेल. भावना व्यक्त करण्यासाठी आणि प्रिय व्यक्तींना मनातलं सांगण्यासाठी संकोच करू नका. आज शांतता मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राखा. आपल्या भोवतालच्या व्यक्तींच्या भल्यासाठी कार्य करा.Lucky Number: 5Lucky Color: Blue
advertisement
5/12
सिंह (Leo) : आज मंगळवारचा दिवस सकारात्मक आहे. आत्मविश्वास असेल आणि आजूबाजूचं वातावरण पाठबळ देणारं असेल. करिअरमध्ये नवीन संधी दाराशी येत आहेत. कुटुंबाचा आधार आणि कुटुंबीयांची सहानुभूती यांमुळे उत्साह वाढेल. समजूतदारपणा आणि संवादामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा असेल. आरोग्याची काळजी घ्या. नियमितपणे व्यायाम करा. तणाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा. स्वत:ला मोकळं ठेवा आणि नवीन गोष्टींविषयी कुतूहल दर्शवा. स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यास योग्य काळ आहे. तुमची अंतर्गत ऊर्जा ओळखा आणि तिला सकारात्मक दिशेने वळवा.Lucky Number: 7Lucky Color: Orange
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज मंगळवारचा दिवस खूप सकारात्मक दिवस आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. मेहनतीला यश मिळेल; पण छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरू नका. नवा प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असलात, तर आज त्यासाठी योग्य वेळ आहे. नात्यात ऊबदारपणा असेल. कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. परस्परसंवाद आणि समजूतदारपणा नात्यांमध्ये सकारात्मक बदल आणेल. मानसिक संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत हा काळ विकास आणि सर्जनशीलतेचा काळ आहे. पुढे जाण्याचं धाडस ठेवा आणि उद्दिष्टांकडे स्पष्टपणे पाऊल टाका.Lucky Number: 6Lucky Color: Purple
advertisement
7/12
तूळ (Libra) : आज विचार आणि भावना यामध्ये संतुलन साधू शकाल. कामाच्या ठिकाणी विचारशीलता आणि सर्जनशीलता तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही सुचवलेल्या कल्पना आणि विचारांची दखल घेतली जाईल. त्यामुळे उद्दिष्टांकडे दृढपणे पुढे जाऊ शकाल. छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. कारण त्याच गोष्टी तुम्हाला यशाकडे नेतील. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. दिवसाचा उपयोग तुमच्या विचारांना स्पष्टता येण्यासाठी आणि मनाचं ऐकण्यासाठी करा. सुलभपणे आणि समन्वयाने पुढे चाला. नव्या संधींचं स्वागत करा.Lucky Number: 9Lucky Color: Green
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आज मंगळवारी तुम्ही अंतर्मनाचा आवाज ऐकू शकाल. नात्यात प्रामाणिकपणा आणि खुलेपणा महत्त्वाचा ठरेल. प्रियजनांसोबत वेळ व्यतीत करा, संवाद साधा. यामुळे बंध दृढ होईल. कामाच्या ठिकाणी काही नवीन रणनीती स्वीकारून फायदा मिळवू शकता. विश्लेषण कौशल्य तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करील. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. उद्दिष्टांकडे पुढे चालत राहा आणि स्वप्नं सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा.Lucky Number: 1Lucky Color: Maroon
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आज मंगळवारी नवीन प्लॅनसाठी आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी वेळ मिळेल. नात्यांमध्येही गोडवा असेल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ व्यतीत करणं आनंद देईल. सामाजिक कार्यात भाग घेण्यासाठी योग्य काळ आहे. नवीन लोकांना भेटू शकता आणि नवे संबंध तयार करू शकता. तुमच्या दिनचर्येत थोडीशी क्रियाशीलता आणणं उत्तम ठरेल. योगासनं करा किंवा जिमला जाण्याचं ठरवा. आज विचार सकारात्मक असतील. त्यामुळे नकारात्मकतेपासून दूर राहा. स्वप्नं सत्यात आणण्यासाठी पावलं उचला.Lucky Number: 4Lucky Color: Sky Blue
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज मंगळवारचा दिवस अत्यंत सकारात्मक दिवस असेल. कामाच्या ठिकाणी नवीन उंची गाठण्यासाठी तयार आहात. कठोर परिश्रम आणि निर्धारामुळे तुम्हाला प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. संवादकौशल्य सुधारेल. त्यामुळे सहकाऱ्यांशी संबंध दृढ होतील. कौटुंबिक जीवनही आनंदाने भरलेलं असेल. प्रिय व्यक्तींसोबत काही वेळ व्यतीत केल्याने नातं मजबूत होईल. आरोग्य चांगलं राहील. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार ऊर्जा देईल. सकारात्मक मानसिकता राखण्याचा प्रयत्न करा. यामुळे पुढे जाण्याची नवीन प्रेरणा मिळेल. सरळमार्गी राहा आणि उद्दिष्टांच्या दिशेने चालत राहा. संधी येत आहेत. तुम्ही फक्त त्या ओळखण्याची गरज आहे.Lucky Number: 8Lucky Color: Red
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आज मंगळवारी नवीन शक्यता आणि संधींचे संकेत आहेत. विचारांमध्ये स्पष्टता असेल. त्यामुळे समस्या सोडवायला मदत होईल. नवीन कल्पना स्वीकारून त्यावर काम करा. आज नव्या दिशेने जाऊ शकता, ते फायदेशीर ठरेल. स्वतःचं विश्लेषण आणि उद्दिष्टांकडे लक्ष देणं फायदेशीर ठरेल. काही जुन्या आठवणी प्रभावित करू शकतात. त्यांच्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा प्रयत्न करा. नातेसंबंध आज मजबूत होतील. एकूणच, आज तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. ती तुम्हाला पुढे जाण्याची मदत करील.Lucky Number: 10Lucky Color: Pink
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज मंगळवारचा दिवस सकारात्मक आणि प्रेरणादायक असेल. आज तुम्ही तुमच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. वैयक्तिक किंवा व्यावसायिक बाबींमध्ये संवेदनशीलतेची काळजी घ्या. दुसऱ्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याची प्रवृत्ती असेल. आज जवळच्या व्यक्तींशी सौहार्दाचे संबंध ठेवणं महत्त्वाचं आहे. आर्थिक बाबतीत काही नवीन संधी येऊ शकतात; पण घाईत निर्णय घेणं टाळा. तुमच्या आर्थिक बाबींचं शहाणपणाने आणि संयमाने व्यवस्थापन करा. एकंदरीत, तुमचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल.Lucky Number: 3Lucky Color: Yellow
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: भयंकर वाईट काळातही लढलो! या 5 राशींचे आता नशीब पालटणार; शनि-मंगळाची कृपा झाली