Nilu Phule : हालाखीत गेलं आयुष्य, आईला करावी लागली धुणी-भांडी, निळू फुले कसे बनले इंडस्ट्रीतील खतरनाक व्हिलन?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Nilu Phule Struggle Days : मराठी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
advertisement
1/8
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
advertisement
2/8
'पिंजरा', 'सामना', 'सिंहासन', 'हमाल दे धमाल', 'एक होता विदूषक' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली.
advertisement
3/8
advertisement
4/8
एका मुलाखतीत निळू फुले यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की, “घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती.
advertisement
5/8
कधीकाळी मंडईमध्ये आमची दोन-चार दुकानं होती, पण नंतर तेही काही राहिलं नाही. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला नोकरी करावी लागायची.”
advertisement
6/8
निळू फुले यांनी पुढे एक खूपच भावूक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, “माझी आई तर चक्क मोलकरणीचं काम करायची. पुण्यामध्ये एका मिशनच्या वसतिगृहात तिने धुण्या-भांड्याचं आणि स्वयंपाकिणीचं काम केलं होतं.” त्यांनी दारिद्र्य खूप जवळून पाहिलं आहे.
advertisement
7/8
निळू फुले यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करून अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नाव कमावलं. त्यांच्या नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडल्या.
advertisement
8/8
निळू भाऊंनी त्यांच्या कामातून सिद्ध केलं की, माणूस कितीही गरीब असला तरी, मेहनतीच्या जोरावर तो यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nilu Phule : हालाखीत गेलं आयुष्य, आईला करावी लागली धुणी-भांडी, निळू फुले कसे बनले इंडस्ट्रीतील खतरनाक व्हिलन?