Actor Life: कधी वेटर, कधी सेल्समन... फ्लॉपवर फ्लॉप 16 FLOP देऊनही हा अभिनेता आहे सुपरस्टार
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Actor Life: बॉलिवूडमध्ये आपलं स्थान भक्कम करण्यासाठी अनेक तरुण तरुणी मेहनत घेत असतात. असाच एक अभिनेता ज्याने कधीकाळी वेटर म्हणून काम केलं तर कधी सेल्समन म्हणून. पण आज तो बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार आहे.
advertisement
1/9

बॉलिवूडमध्ये आपलं स्थान भक्कम करण्यासाठी अनेक तरुण तरुणी मेहनत घेत असतात. असाच एक अभिनेता ज्याने कधीकाळी वेटर म्हणून काम केलं तर कधी सेल्समन म्हणून. पण आज तो बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार आहे.
advertisement
2/9
सलग 16 सिनेमे फ्लॉप देऊनही या अभिनेत्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. हा अभिनेता कोण आहे? याविषयी अधिक डिटेल माहिती जाणून घेऊया.
advertisement
3/9
आपण बोलत असलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आहे. अक्षय कुमारचा 9 सप्टेंबरला वाढदिवस आहे. तो यंदा 57वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण आजचा हा स्टार एकेकाळी संघर्ष करत होता, हे अनेकांना माहितीच नाही.
advertisement
4/9
वेटर, सेल्समन, फोटोग्राफरचा असिस्टंट अशी अनेक छोटी कामं करून अक्षयने आजचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. अक्षय कुमारचा जन्म अमृतसर येथे झाला. वडील भारतीय सैन्यात होते, त्यामुळे शिस्त घरात होतीच. त्याचे बालपण दिल्लीतील चांदणी चौकात गेले. त्याला अभ्यासापेक्षा खेळांमध्ये जास्त रस होता. नंतर वडिलांच्या नोकरीमुळे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.
advertisement
5/9
अक्षयला लहानपणापासूनच मार्शल आर्ट्सची आवड होती. वडिलांनी पैसे साठवले आणि त्याला कराटे शिकण्यासाठी थायलंडला पाठवले. मात्र तिथे राहण्यासाठी आणि शिकण्यासाठी त्याला स्वतः काम करून पैसे कमवावे लागले. वेटर आणि सेल्समन म्हणून काम करताना त्याने खूप कष्ट सोसले.
advertisement
6/9
भारतामध्ये परत आल्यावर त्याने मॉडेलिंग सुरू केली. जयेश सेठ या फोटोग्राफरसाठी तो असिस्टंट म्हणून काम करायचा आणि त्याचवेळी स्वतःचे फोटोशूटही करून घ्यायचा. हळूहळू त्याला जाहिराती आणि छोटे प्रोजेक्ट मिळू लागले.
advertisement
7/9
1991 साली आलेल्या ‘सौगंध’ या चित्रपटातून अक्षयने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण हा सिनेमा फारसा चालला नाही. त्यानंतर त्याने सलग 16 फ्लॉप चित्रपट दिले. स्वतः अक्षय म्हणतो, “त्या काळात स्टार होण्याची आशाही संपली होती.”
advertisement
8/9
1994 मध्ये आलेल्या ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या सिनेमाने त्याला स्टारडम मिळवून दिलं. या सिनेमानंतर त्याला ‘खिलाडी’ ही ओळख मिळाली आणि तो अॅक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करू लागला. फक्त अॅक्शन नाही, तर कॉमेडीमध्येही अक्षयने आपली वेगळी छाप पाडली. हेरा फेरी, भूल भुलैया, वेलकम यासारख्या सिनेमांनी त्याला वेगळं स्थान दिलं.
advertisement
9/9
आज अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला सर्वात शिस्तबद्ध अभिनेता मानला जातो. तो पहाटे चारला उठतो, जंक फूडपासून दूर राहतो आणि फिटनेससाठी तरुण अभिनेत्यांनाही मागे टाकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actor Life: कधी वेटर, कधी सेल्समन... फ्लॉपवर फ्लॉप 16 FLOP देऊनही हा अभिनेता आहे सुपरस्टार